प्रतिनिधी
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात रोज नवनवीन घडोमोडी घडत आहेत. आज या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयने(ईडी) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना समन्स पाठवले आहे आणि उद्या, ९ मार्च रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. Delhi excise policy case ED summons Telangana CM KCRs daughter K Kavitha
या अगोदर याप्रकरणी सीबीआयने १२ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये भारत राष्ट्र समितीच्या नेत्या कविता यांची सात तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती.कविता यांना समन्स दिल्ली न्यायालयाने हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई यांना १३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत आणि मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर आले आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी कविता यांचे स्वीय सहाय्यक बुचीबाबू गोरंटला यांना सोमवारी कोर्टाकडून दिलासा मिळाला. त्यांना राउज अॅव्हेन्यू कोर्टातून जामीन मिळाला. सीबीआयच्या टीमने बुचीबाबूला हैदराबादमधून अटक केली होती. मद्य धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित भूमिकेसाठी आणि हैदराबादस्थित घाऊक व किरकोळ परवानाधारकांना तसेच त्यांच्या लाभार्थी मालकांना चुकीचे फायदे देण्याबद्दल बुचीबाबू गोरंटला याला अटक केली होती.
दिल्लीमधील कथित मद्यविक्री घोटाळ्याची देशभरात चर्चा होत आहे. या कथित घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी अटक केली आहे. सध्या सिसोदिया यांना ४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीमधील मद्यविक्री घोटाळ्यात दक्षिण गटाचा समावेश असल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे.
Delhi excise policy case ED summons Telangana CM KCRs daughter K Kavitha
महत्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
- नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली
- Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार