न्यायालयाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या वकीलास आरोपपत्राची ई-प्रत देण्याचे निर्देश
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. Delhi excise case Court extends Manish Sisodias judicial custody till May 12
सीबीआयच्या एफआयआर प्रकरणी सिसोदिया यांना गुरुवारी राउस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. येथे सीबीआयने सांगितले की, या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यावर, सिसोदिया यांच्या वतीने सांगण्यात आले की, आतापर्यंत आम्हाला आरोपपत्राची डुप्लिकेट प्रत मिळालेली नाही. त्याची प्रत मिळवण्याचा आम्हाला अधिकार आहे. यावर राउस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या वकीलास आरोपपत्राची ई-प्रत देण्याचे निर्देश दिले. याशिवाय न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मे रोजी ठेवली आहे.
ईडी प्रकरणाचा निकाल आज येणार –
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडी प्रकरणात दिलासा मिळू शकला नाही. त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आज (२८ एप्रिल)पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. १८ एप्रिल रोजी जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. ईडी त्यांच्या जामिनावर निर्णय घेणार आहे.
Delhi excise case Court extends Manish Sisodias judicial custody till May 12
महत्वाच्या बातम्या
- मौत ते सौदागर” ते “विषारी साप” व्हाया “कबर खुदेगी”; नरेंद्र मोदींना 91 वेळा काँग्रेसची शिवीगाळ!!
- जोडे पुसणारे राज्यकर्ते, उद्धव ठाकरेंची घसरली जीभ; वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या…; एकनाथ शिंदेंचे चोख प्रत्युत्तर
- सुदानमधून २४६ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले; भावूक महिला म्हणाली, ‘’पंतप्रधान मोदी…’’
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’