• Download App
    दिल्लीतील नगरसेवक हसीब उल हसन आम आदमी पार्टीच्या तिकिटासाठी विजेच्या ट्रान्समिशन टॉवरवर Delhi corporator Haseeb ul Hasan on the electricity transmission tower for the Aam Aadmi Party ticket

    दिल्लीतील नगरसेवक हसीब उल हसन आम आदमी पार्टीच्या तिकिटासाठी विजेच्या ट्रान्समिशन टॉवरवर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आत्तापर्यंत कुठल्याही शेतकरी अथवा सामाजिक आंदोलनांमध्ये टाकीवर चढून जाणे किंवा विजेच्या ट्रान्समिशन टॉवर वर चढून जाणे, मोबाईल टॉवरवर चढणे हे आपण बघितले आहे. पण राजकारणात निवडणुकीच्या तिकिटासाठी एका स्थानिक नेत्याचे विजेच्या ट्रान्समिशन टॉवरवर चढणे हे कदाचित पहिल्यांदाच घडले आहे. Delhi corporator Haseeb ul Hasan on the electricity transmission tower for the Aam Aadmi Party ticket

    दिल्ली महापालिकेतील आम आदमी पार्टीचे माजी नगरसेवक हसीब उल हसन दिल्लीतील शास्त्री पार्क मेट्रो स्टेशन जवळ विजेच्या ट्रान्समिशन टॉवर वर चढले आहेत. आम आदमी पार्टीने महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले त्यामुळे पुन्हा तिकीट दिले नाही तर ट्रान्समिशन टावर वरून उतरणारच नाही, अशी भूमिका त्याने टॉवर वरूनच जाहीर केली आहे.

    इतकेच नाही तर मला काही झाले तर आम आदमी पार्टीचे दुर्गेश पाठक आणि आतिशी हे नेते जबाबदार असतील कारण त्यांनी माझी सगळी डॉक्युमेंट्स ताब्यात घेतली आहेत, असा आरोप हसन यांनी केला आहे.

    हसीब उल हसन हे टॉवर वर चढल्याचे पाहून तेथे बघ्यांची भरपूर मोठी गर्दी जमली असून पोलीस आणि फायर ब्रिगेड त्यांना टॉवर वरून वरून उतरवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

    Delhi corporator Haseeb ul Hasan on the electricity transmission tower for the Aam Aadmi Party ticket

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट