• Download App
    अंशू प्रकाश मारहाण प्रकरणातून मुख्यमंत्री केजरीवाल तसेच सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता|Delhi CM Kejriwal and Dy. CM sisodiya aquited by court

    अंशू प्रकाश मारहाण प्रकरणातून मुख्यमंत्री केजरीवाल तसेच सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – तत्कालीन मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर २०१८ साली झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाच्या नऊ आमदारांची निर्दोष मुक्तता केली.Delhi CM Kejriwal and Dy. CM sisodiya aquited by court

    न्यायालयाच्या या निकालाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वागत केले आहे. या निकालाच्या निमित्ताने सत्याचा विजय झाला असल्याची सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय तपास संस्था केजरीवालांच्याविरोधात कारस्थान रचत असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. केजरीवालांनीही ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले.



    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी १९ फेब्रुवारी २०१८ रोजी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीतच अंशू प्रकाश यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अकरा आमदारांना आरोपी करण्यात आले होते.

    केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह नऊ आमदारांना ऑक्टोबर २०१८ मध्येच जामीन मंजूर करण्यात आला होता. या घटनेनंतर दिल्ली सरकारविरुद्ध नोकरशहा असा संघर्ष पेटला होता.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश देताना आपचे आमदार अमानतुल्ला आणि प्रकाश जारवाल यांच्यावर आरोप निश्चिलत करण्याचे आदेश दिले.

    Delhi CM Kejriwal and Dy. CM sisodiya aquited by court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : अखंड भारतात राहणाऱ्या लोकांचा डीएनए सारखाच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

    आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का, महुआ मोइत्रा यांच्या पतीवर गंभीर आरोप

    TMC MLA Jivan Krishna Saha : शालेय भरती घोटाळ्यात TMC आमदाराला अटक; ED अटकेसाठी आल्यानंतर भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला