• Download App
    Delhi Building Collapses : दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 2 मुलांचा मृत्यू|Delhi Building Collapses Four storey building collapsed in Delhi Sabzi Mandi area CM expressed grief

    Delhi Building Collapses : दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून २ मुलांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे भाजी मार्केट दिल्लीच्या मलका गंज परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याबाहेर काढलेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.Delhi Building Collapses Four storey building collapsed in Delhi Sabzi Mandi area CM expressed grief

    ढिगाऱ्याखालून काढताच या दोन्ही मुलांना हिंदुराव रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. एका मुलाचे वय 12 वर्षे, तर दुसऱ्याचे अवघे 7 वर्षे होते.



    इमारतीच्या तळमजल्यावर दुधाची डेअरी होती. एक कारसुद्धा या दुर्घटनेत अडकली आहे. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक लोकांची गर्दी जमली आहे. त्याचबरोबर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

    मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

    दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी ट्वीट केले की, “भाजी मंडई परिसरात इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात व्यग्र आहे, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मी वैयक्तिकरीत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

    Delhi Building Collapses Four storey building collapsed in Delhi Sabzi Mandi area CM expressed grief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली