• Download App
    LOCKDOWN : मुंबई नंतर दिल्ली थांबली ; वीकेंड कर्फ्यू ; केजरीवाल यांची घोषणा ! Delhi :Arvind Kejriwal announces weekend curfew; malls, gyms to shut on weekdays

    LOCKDOWN : मुंबईनंतर ‘दिल्ली’ थांबली ; वीकेंड कर्फ्यू ; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

    • दिल्लीत कोरोनाचा संसर्ग बेकाबू होत चालला असून, केजरीवाल सरकारने आठवड्याच्या अखेरीस संचारबंदी लागू केली आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल.

    • फेब्रुवारी महिन्यात दिवसाला ५०० ते ९०० च्या प्रतिदिन रुग्‍णवाढ होत होती. आता ही रुग्णसंख्या दिवसाला १७ हजारांच्याही वर गेली आहे. अर्थातच यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. 

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : महाराष्ट्रानंतर कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जतनेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.Delhi :Arvind Kejriwal announces weekend curfew; malls, gyms to shut on weekdays

    कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड कर्फ्यू लावत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान, कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. तसेच आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभांना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल आणि चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

    त्याचबरोबर पदार्थांची होम डिलिव्हरी व आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना कोरोना निर्बंधांचे पालन करावे लागेल. तर कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत.

    Delhi :Arvind Kejriwal announces weekend curfew; malls, gyms to shut on weekdays

     

    Related posts

    PM Modi : पीएम मोदींचा ट्रम्प यांच्याशी फोनवर संवाद; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यावर चर्चा, या वर्षी सहाव्यांदा बातचीत

    Indian Rupee : रुपया सर्वकालीन नीचांकी पातळीवर; 1 डॉलरच्या तुलनेत 90.47 वर; परदेशी निधी काढल्याने दरात घसरण

    Anna Hazare : लोकायुक्तासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात; 30 जानेवारीपासून करणार उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र