• Download App
    सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय । Delhi Air Pollution Schools will remain closed from tomorrow till further orders, Supreme Court gives 24-hour ultimatum to Kejriwal government

    सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय

    Delhi Air Pollution : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या उपाययोजनांवर नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, ‘आम्हाला असे वाटते की काहीही होत नाहीये. प्रदूषण वाढतच आहे. केवळ वेळ वाया जात आहे. सलग चौथ्या आठवड्यात कोर्टाने राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये श्वसनाच्या त्रासावर युक्तिवाद ऐकला. दरम्यान, दिल्ली सरकारने उद्यापासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Delhi Air Pollution Schools will remain closed from tomorrow till further orders, Supreme Court gives 24-hour ultimatum to Kejriwal government


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या उपाययोजनांवर नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, ‘आम्हाला असे वाटते की काहीही होत नाहीये. प्रदूषण वाढतच आहे. केवळ वेळ वाया जात आहे. सलग चौथ्या आठवड्यात कोर्टाने राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये श्वसनाच्या त्रासावर युक्तिवाद ऐकला. दरम्यान, दिल्ली सरकारने उद्यापासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    कडक कारवाईचा इशारा देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली आणि शेजारील राज्यांना औद्योगिक आणि वाहनांच्या प्रदूषणाविरुद्ध कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, जे हवेची गुणवत्ता बिघडवण्याच्या मुख्य कारणांपैकी एक मानले जाते. गेल्या महिन्यात दिवाळीपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचे ढासळणारे आरोग्य यामागे पराली जाळण्याचे एक कारण असल्याचे सांगण्यात आले. यातून वाद-प्रतिवाद सुरू झाले. महिना उलटला तरी स्वच्छ हवेसाठी दिल्लीवासीय तिष्ठत आहेत.

    पुढील आदेशापर्यंत शाळा बंद

    सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दिल्ली सरकारने उद्यापासून दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवल्या आहेत. मंत्री गोपाल राय यांनी गुरुवारी ही माहिती दिली. “शहरातील प्रचलित वायू प्रदूषण पातळी लक्षात घेता, दिल्लीतील सर्व शाळा उद्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील,” असे ते म्हणाले. याआधी न्यायालयाने म्हटले की, जर तुम्ही वडिलांकडून घरून काम करून घेतले असेल तर मुलांना शाळेत जाण्याची सक्ती का केली जात आहे. कोर्टाने फटकारल्यानंतर दिल्ली सरकारने उद्यापासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    Delhi Air Pollution Schools will remain closed from tomorrow till further orders, Supreme Court gives 24-hour ultimatum to Kejriwal government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार