वृत्तसंस्था
श्रीनगर : 23व्या कारगिल विजय दिवसानिमित्त जम्मू येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे. हे कसे शक्य आहे की बाबा अमरनाथ भारतात आहेत आणि मां शारदा शक्ती नियंत्रण रेषेच्या (LOC) पलीकडे आहेत.Defense Minister Rajnath Singh’s opinion on PoK If Baba is in Amarnath, how can Devi Sarada’s Dham remain across the LoC?
यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी शारदा पीठाचा उल्लेख करताना सांगितले की, पीओकेवर संसदेत ठराव मंजूर झाला आहे. पाकव्याप्त काश्मीर, काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे आणि भारताचाच भाग राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले. बाबा अमरनाथ हे शिवाच्या रूपाने आपल्यासोबत आहेत, मग LOC च्या पलीकडे माता शारदा शक्तीचा वास कसा राहू शकतो. शारदा पीठ हे हिंदू देवी सरस्वतीचे मंदिर आहे, ज्याला शारदा म्हणूनही ओळखले जाते.
राजनाथ यांनी नेहरूंचाही केला उल्लेख
यावेळी संरक्षणमंत्र्यांनी चीनवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 1962 मध्ये चीनने लडाखमधील आमच्या भूभागावर कब्जा केला होता. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते. राजनाथ सिंह म्हणाले की, मी नेहरूंच्या हेतूवर शंका घेणार नाही. त्या काळात, पंतप्रधान असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत नेहरूंचे हेतू चांगले असू शकतात, परंतु ते धोरणांना लागू होत नाही. 1962 च्या तुलनेत आजचा भारत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे.
कारगिल शहिदांचे स्मरण
राजनाथ सिंह यांनी कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांचे स्मरण केले. जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण करा, असे ते म्हणाले.
Defense Minister Rajnath Singh’s opinion on PoK If Baba is in Amarnath, how can Devi Sarada’s Dham remain across the LoC?
महत्वाच्या बातम्या
- द्रौपदी मुर्मू यांना आज सरन्यायाधीश देणार राष्ट्रपतिपदाची शपथ, असा होईल सोहळा
- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल : ज्यांना शेंदूर लावला तेच शिवसेना गिळायला निघाले; पुष्पगुच्छ नको, शपथपत्र व सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या!
- उद्धव ठाकरे : खास सामना मुलाखतीतून उरलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न!!
- 6 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासात देशात 19,100 नवीन रुग्ण, महाराष्ट्र-केरळनंतर बंगाल-ओडिशामध्ये संसर्ग वाढला