वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशप्रेमी विद्यार्थ्यांसाठी आनंद वार्ता दिली आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCC च्या विस्तारीकरणाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे आता NCC मध्ये तब्बल 3 लाख कॅडेट्सची रिक्त पदे भरण्यात येतील.Defence Minister Rajnath Singh has approved a proposal for expansion of the National Cadet Corps (NCC) with the addition of three lakh cadet vacancies.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून 3 लाख कॅडेट रिक्त पदांची भर घातली जाईल. या विस्तारीकरणामुळे देशभरातील शैक्षणिक संस्थांची NCC मधून कॅडेट्सच्या मदतीची वाढती मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या वर्षभरातच म्हणजे 1948 मध्ये NCC सुरुवात करण्यात आली. त्यावेळी देशभरात फक्त20000 कॅडेट्सची भरती झाली होती, पण आता त्या छोट्या संख्येवरून वरून, टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन NCC कॅडेट्सची संख्या आता तब्बल 20 लाख मंजूर पदांची होईल. ती जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना बनेल.
एकीकडे मोदी सरकारने अग्निवीर भरतीची योजना सुरू करून ती सुरुवातीच्या टप्प्यातच यशस्वी करून दाखवली. तब्बल 40000 अग्निवीरांची भरती विविध सैन्य दलांमध्ये केली. अग्निवीरांच्या भरतीची प्रक्रिया दर 6 महिन्यांनी सुरूही झाली. त्या पाठोपाठ आता मोदी सरकारने NCC च्या विस्तारीकरणाची योजना जाहीर करून त्यामध्ये तब्बल 300000 कॅडेट्सची भरती जाहीर करून अग्निवीर योजनेला खऱ्या अर्थाने पाठबळ दिले आहे. कारण याच NCC कॅडेट्स मधून पुढचा टप्पा म्हणून अग्निवीर भरतीकडे युवक वळणार आहेत.
Defence Minister Rajnath Singh has approved a proposal for expansion of the National Cadet Corps (NCC) with the addition of three lakh cadet vacancies.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने JKNFवर पाच वर्षांसाठी बंदी घातली; जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा होता कट
- रेल्वेच्या एकता मॉल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस जैसलमेरमध्ये कोसळले
- काँग्रेसने मध्यप्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी केली जाहीर