• Download App
    कालीमातेबाबत निंदनिय पोस्ट, व्यवसाय करताना सामान्यांच्या भावनांचा आदर करा, न्यायालयाने ट्विटरला सुनावले|Defamatory post about Kalimata, respect the feelings of the common man while doing business, the court heard on Twitter

    कालीमातेबाबत निंदनिय पोस्ट, व्यवसाय करताना सामान्यांच्या भावनांचा आदर करा, न्यायालयाने ट्विटरला सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कालीमातेबाबत निंदनिय पोस्ट असल्याची तक्रार आल्यावर न्यायालयाने ट्विटरला सुनावले आहे. तुमचा व्यवसय करताना सामान्य लोकांच्या भावनांचा आदर करा, असे सुनावले आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी ट्विटरला हिंदू देवतांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितले.Defamatory post about Kalimata, respect the feelings of the common man while doing business, the court heard on Twitter

    न्यायालयाने म्हटले की ट्विटरसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया माध्यामांना आपला व्यवसाय करताना, सामान्य लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं आहे. याचिकाकर्ते आदित्य सिंग देशवाल न्यायालयाने सांगितले होते की त्यांना ट्विटरवर हिंदू देवीचे (काली मातेचे) काही अत्यंत निंदनीय पोस्ट आढळल्या होत्या.



    ट्विटरला सुनावताना न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही सामान्य लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे कारण तुम्ही लोकांसाठी व्यवसाय करत आहात. त्यांच्या भावनांना महत्त्व दिले पाहिजे. तुम्ही अशा पोस्ट काढून टाका, असे न्यायमूती डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले. तुम्ही राहुल गांधींच्या बाबतीतही ते केले आहे.

    याचिकाकर्ते आदित्य सिंग देशवाल म्हणाले होते की,एका ट्विटर अकाउंटवर मा कालीबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट्स पाहिल्या आणि देवतेचे प्रतिनिधित्व लज्जास्पद आणि अपमानजनक पद्धतीने केले गेले.ही पोस्ट माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता नियम, 2021 चे उल्लंघन करते.

    जुलैमध्ये ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले होते की, कंपनी नवीन आयटी नियमांतर्गत अंतरिम मुख्य अनुपालन अधिकारी आणि अंतरिम स्थानिक तक्रार अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

    Defamatory post about Kalimata, respect the feelings of the common man while doing business, the court heard on Twitter

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Indian Army : भारतीय सैन्याचा 30 ऑक्टोबरपासून पाक सीमेवर सराव; पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी आपले हवाई क्षेत्र बंद केले, उड्डाणांवर बंदी

    Jyoti Malhotra : हिसारची यूट्यूबर ज्योती तुरुंगातून बाहेर येणार नाही; जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाने म्हटले- तपासावर परिणाम होऊ शकतो

    Tamil Nadu : कोट्यवधींच्या इरिडियम व्यवहारप्रकरणी तामिळनाडूमध्ये 27 जणांना अटक; CBCIDने ग्राहक असल्याचे भासवून कारवाई केली