• Download App
    पाकिस्तानी खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून वेब सिरीजमध्ये बदनामी; ट्रेलरवर संतापाची लाट Defamation in web series by showing violence against Hindus

    पाकिस्तानी खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून वेब सिरीजमध्ये बदनामी; ट्रेलरवर संतापाची लाट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाकिस्तान कायम भारतावर कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नात भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी विविध माध्यमांचा, व्यासपीठाचा वापर करतो, असाच एक घुणास्पद प्रकार पाकिस्तानने वेब सीरिजच्या माध्यमातून केला आहे. Defamation in web series by showing violence against Hindus

    पाकिस्तानमध्ये ‘सेवक-द कन्फेशन’ नावाची वेब सिरीज बनविली आहे. ही वेब सिरीज केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी बनवली आहे. त्याचा ट्रेलर येताच त्यावर सोशल मीडियावर चौफेर टीका सुरू झाली आहे.

    काय आहे या वेब सिरीजमध्ये? 

    ही वेब सिरीज मुळातच भारताचा अपप्रचार करण्यासाठी बनवण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यात हिंदूंची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये १९८४ ची दंगल, गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा वाद या घटनासह सह दीप सिद्धू, हेमंत करकरे, गौरी लंकेश आणि जुनैद खान यांच्या आयुष्यवरही या वेब सीरिजमध्ये कथानक रचण्यात आले आहे.

    या सर्व घटना चुकीच्या पद्धतीने दाखवून भारतात हिंदू कसे हिंसक आहे, मुसलमानांवर अन्याय करतात असे दाखवण्याचा खोडसाळपणा करण्यात आला आहे. यावर नेटकरी चांगलेच संतापले असून वेब सिरीज विरुद्ध सोशल मीडियात संताप उसळला आहे.

    काय म्हणतात नेटकरी? 

    भारत राधाकृष्णन म्हणतात, अबे…खुद के देश को देख, तेरे पीएम भीख मांगते फिर रहा है. तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सैन्यबळ वापरून पदच्युत केले. इतरांकडे बोट दाखवण्यापूर्वी आतल्या दुर्गंधीकडे लक्ष द्या. मला पाकिस्तानच्या
    परिस्थितीची खिल्ली उडवायची नव्हती, पण माझ्यावर जबरदस्ती करू नका.

    Defamation in web series by showing violence against Hindus

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान