सध्या विश्वविक्रम तिच्या नावावर असल्याने ती सुवर्ण जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानली जात होती.
विशेष प्रतिनिधी
पॅरीस : दीप्ती जीवांजी ( Deepti Jivanji ) हिने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत T20 प्रकारात अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावले आहे. तिने ५५.८२ सेकंदात शर्यत पूर्ण करून पदकावर निशाणा साधला आहे. दीप्ती पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. सध्या विश्वविक्रम तिच्या नावावर असल्याने ती सुवर्ण जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानली जात होती. पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताला तिने 16 वे पदक मिळवून दिले.
एकीकडे भारताच्या दीप्तीने ५५.८२ सेकंदात शर्यत पूर्ण केली. रौप्य पदक तुर्कीच्या एसेल ओंडरने जिंकले, जिने 55.23 सेकंदात शर्यत पूर्ण केली. युक्रेनच्या युलिया शुलियरने 400 मीटर शर्यत 55.16 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. दीप्तीने शर्यतीच्या शेवटच्या क्षणांमध्ये खूप प्रयत्न केला आणि सुवर्ण जिंकण्याच्या अगदी जवळ आली, परंतु शेवटच्या 10 मीटरमध्ये युक्रेनच्या धावपटूने तिचा वेग वाढवला आणि सुवर्णपदकावर निशाणा साधला.
पॅरा ॲथलेटिक्समधील महिलांच्या 400 मीटर शर्यती T20 प्रकारात भारताची दीप्ती सध्याची विश्वविजेती आहे. यावर्षी कोबे येथे झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय 2022 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही ती सुवर्णपदक विजेती होती. दीप्तीने पॅरालिम्पिकच्या कोणत्याही ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतासाठी सहावे पदक जिंकले आहे.
Deepti Jivanji won the bronze medal for India in Paralympics
महत्वाच्या बातम्या
- Droupadi Murmu महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
- Supreme Court : अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांनी सावधान!, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले ‘हे’ कडक निर्देश
- Rains : तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू; 432 रेल्वे रद्द
- Samarjeet ghatge : समरजित घाटगेंनी पवारांसमोरच जयंत पाटलांना बजावले, मित्राचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी गैबी चौकात या!!