• Download App
    दीपक शर्मा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना उडवून देण्याची धमकी । Deepak Sharma's Twitter account threatens to blow up Prime Minister Modi and Chief Minister Yogi

    दीपक शर्मा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना उडवून देण्याची धमकी

    या सर्व ट्विटची दखल घेत यूपी 112 च्या अधिकाऱ्यांनी उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. Deepak Sharma’s Twitter account threatens to blow up Prime Minister Modi and Chief Minister Yogi


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ट्विटरवरील दीपक शर्मा नावाच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांत खळबळ उडाली. वरिष्ठांच्या सूचनेवरून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

    गुरुवारी ट्विटरवर एका अज्ञात व्यक्तीने दीपक शर्मा नावाचे खाते तयार केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर या ट्विटर अकाउंटवरून अनेक आक्षेपार्ह ट्विटही करण्यात आले आहेत.

    या सर्व ट्विटची दखल घेत यूपी 112 च्या अधिकाऱ्यांनी उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला.क्राइम ब्रँचचे अनेक पथक तपासात गुंतले असून काही सुगावाही लागल्याचे सांगण्यात येत आहे.



    यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या होत्या

    यापूर्वीही सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या होत्या.त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासोबतच अनेक आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले.

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे अनेक पथके तपास करत आहेत.आरोपींच्या अटकेबरोबरच या प्रकरणाचा लवकरच खुलासा करून कठोर कारवाई केली जाईल.

    Deepak Sharma’s Twitter account threatens to blow up Prime Minister Modi and Chief Minister Yogi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले