• Download App
    WPI Inflation: : किरकोळ महागाई दरानंतर आता घाऊक महागाई दरात सलग अकराव्या महिन्यात घसरण! Decline in wholesale inflation rate for the eleventh month in a row

    WPI Inflation : किरकोळ महागाई दरानंतर आता घाऊक महागाई दरात सलग अकराव्या महिन्यात घसरण!

    एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १.३४ टक्क्यांवरून -०.९२ टक्क्यांवर आला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर (-) ०.९२ टक्के होता. तर मार्चमध्ये घाऊक महागाई दर (WPI) १.३४ टक्के होता. अशाप्रकारे एप्रिलमध्ये सलग अकराव्या महिन्यात घाऊक महागाई दरात घट झाली आहे. Decline in wholesale inflation rate for the eleventh month in a row

    सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, ऊर्जेच्या किमतीत झालेली घट, अखाद्य आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली घट यामुळे महागाई दरात घट झाली आहे. एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई २.३२ टक्क्यांवरून 0.17 टक्क्यांवर आली आहे. प्रमुख वस्तूंच्या महागाईत घट होवून ती १.६० टक्क्यांवर आली. तर एप्रिलमध्ये हा आकडा २.४० टक्के होता.

    एप्रिलमध्ये इंधन आणि वीज महागाई ०.९३ टक्क्यांवर आली. मार्चमध्ये ती ८.९६ टक्के होती. तर, फेब्रुवारीमध्ये ती १३.९६ टक्के होती. उत्पादित उत्पादनांचा महागाई दर (-) २.४२ टक्क्यांवर आला आहे. जो मार्चमध्ये महागाई दर (-) ०.७७ टक्के होता.

    वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर कमी होण्याचे कारण म्हणजे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणे. मूलभूत धातू, खाद्यपदार्थ, खनिज तेल, कापड, खाद्येतर वस्तू, रसायन, रबर, कागद इत्यादींच्या किमती झपाट्याने खाली आल्या आहेत. त्याचा परिणाम घाऊक महागाईच्या आकडेवारीत दिसून येतो.

    Decline in wholesale inflation rate for the eleventh month in a row

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार