विशेष प्रतिनिधी
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाविरोधात (ईडी) केलेल्या याचिकेवर एकल पीठाकडे सुनावणी घ्यायची की खंडपीठापुढे यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी घेण्याचा दावा ‘ईडी’च्या वतीने करण्यात आला आहे.Decision on Anil Deshmukh plea will be on this Monday
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे. यावर ‘ईडी’नेही चौकशी सुरू केली असून, देशमुख यांना समन्स बजावले आहे. या समन्सविरोधात देशमुख यांनी याचिका केली आहे. सध्या एकल पीठाकडे याचिकेवर सुनावणी सुरू आहे. देशमुख यांची एक याचिका सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहे. यावरही ‘ईडी’कडून आक्षेप घेण्यात आला.
‘ईडी’ने सुरू केलेल्या कारवाई आणि समन्सविरोधात आतापर्यंत नेहमी दोन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होत असते. त्यामुळे देशमुख यांनी केलेल्या याचिकेवरदेखील खंडपीठापुढे व्हायला हवी, त्यामुळे एकल पीठाकडे यावर सुनावणी होऊ शकत नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी न्या. संदीप शिंदे यांच्यापुढे केला;
मात्र ही याचिका कायदेशीर दृष्टीने योग्य आहे आणि तिची सुनावणी एकल पीठाकडे होऊ शकते, असा दावा याचिकादार देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी केला. यामुळे न्या. शिंदे यांनी याचिकेवर सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला.
Decision on Anil Deshmukh plea will be on this Monday
महत्त्वाच्या बातम्या
- मागास उत्तर प्रदेशचा प्रगत केरळ, महाराष्ट्राला धडा, ३३ जिल्हे कोरोनामुक्त, गेल्या २४ तासांत केवळ १० नवे रुग्ण
- चंद्रयान -२ उपकरणांनी नोंदविली महत्वपूर्ण निरीक्षणे, त्यावरून चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याचा बर्फ,क्रोमियम व मँगनीजही सापडले
- समाजवादी पक्षाचे आजम खान यांना दणका, शैक्षणिक कारणांसाठी दिलेल्या जमिनीवर एक प्रार्थनास्थळ उभारल्याने जौहर विद्यापीठाची १७० एकर जमीन सरकारने घेतली परत
- २०० किलो चॉकलेटपासून बनवली गणेशमूर्ती , दुधात करणार विसर्जित