• Download App
    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मतांचा आकडा 14; पण जागा मुंबई महापालिकेची की रेल्वे पोलिसांची वाद वाढला!! Death toll in Ghatkopar hoarding incident 14

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14; पण जागा मुंबई महापालिकेची की रेल्वे पोलिसांची वाद वाढला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपरात वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा 14 वर गेला आहे. तर 75  जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 1 व्यक्ती गंभीर जखमी असून 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 74 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.  Death toll in Ghatkopar hoarding incident 14

    पण या दुर्घटनेतील मतांचा आकडा जरी 14 झाला असला तरी होर्डिंगची जागा महापालिकेची की रेल्वे पोलिसांची हा वाद वाढला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले.

    अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळले. या होर्डिंगखाली तब्बल 80 वाहने अडकल्याची माहिती समोर आली होती.

    बचावकार्यात अडचणी

    पेट्रोल पंप, सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता. 13 जणांचा मृत्यू राजवाडी रुग्णालयात आणि एका व्यक्तीचा मृत्यू सायनन रुग्णालयात झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन जाहीर केली, तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करत आहे.

    पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहे.  मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. (120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे. त्यांच्यावर देखील महापालिका कारवाई करत आहे.

    दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

    घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रूपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. या दुर्घटनेसाठी दोषी ठरलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश दिले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घटनेची पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतली.

    Death toll in Ghatkopar hoarding incident 14

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र