वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जीवाला धोका असून त्याला सार्वजनिक धमक्या आल्या आहेत. गुरुवारी (2 मार्च) रात्री उशिरा दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुकानावर अचानक हल्ला केला. गोळीबारात दुकानाच्या काचाही फुटल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तेथे एक धमकीची चिठ्ठीही सोडली. ज्यामध्ये लिहिले आहे, “मेस्सी, आम्ही तुझी वाट पाहतोय…”Death threat to famous footballer Lionel Messi, indiscriminate firing at family shop
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिओनेल मेस्सीचे कुटुंब अर्जेंटिनाच्या रोजारियो येथे सुपरमार्केट चालवते. तेथे गुरुवारी रात्री दोन बंदूकधाऱ्यांनी गोळीबार करून खळबळ उडवून दिली. हल्लेखोरांनी दुकानावर 14 गोळ्या झाडल्या, ज्यामुळे दुकानासमोरील काचा फुटल्या.
‘जावकिन तुला वाचवू शकणार नाही, कारण तो…’
रोझारियोचे महापौर पाब्लो जावकिन यांनी हल्ल्याची पुष्टी केली. ज्या सुपरमार्केटवर हल्ला झाला ते लिओनेल मेस्सीच्या कुटुंबाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याद्वारे शहरात अराजक माजवायचे होते, असे ते म्हणाले. मेस्सीसाठी हल्लेखोरांनी सोडलेल्या चिठ्ठीत रोझारियोच्या महापौरांचे नावदेखील आहे. “जावकिन तुला वाचवू शकणार नाही, कारण तो नार्को (ड्रग स्मगलर)) आहे, असे या चिठ्ठीत लिहिले होते.”
‘हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही’
प्रांतीय पोलिस सहायक इव्हान गोन्झालेझ यांनी कॅडेना 3 टेलिव्हिजन स्टेशनला सांगितले की, हा हल्ला धोका नव्हता, परंतु लक्ष वेधण्याचा हेतू होता. हा हल्ला झाला तेव्हा सुपरमार्केटमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू’
याप्रकरणी प्रभारी अभियोक्ता फेडेरिको रेबोला यांनी पत्रकारांना सांगितले की, मेस्सीच्या कुटुंबाला याआधी कोणत्याही धमक्या आल्या नाहीत. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आणि छायाचित्रे आहेत, तपास वेगाने सुरू आहे, गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, रोझारियो ही पराना नदीवरील पोर्ट सिटी हळूहळू अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले आहे. ते 2022 मध्ये 287 खुनांसह अर्जेंटिनामधील सर्वात हिंसक शहर ठरले.
Death threat to famous footballer Lionel Messi, indiscriminate firing at family shop
महत्वाच्या बातम्या
- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल
- 5 राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल : काँग्रेसने 6 पैकी 3 जागा जिंकल्या, महाराष्ट्रातील कसबापेठची जागा 28 वर्षांनंतर भाजपने गमावली
- लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार TMC : विरोधी ऐक्याच्या प्रचाराला सुरुंग, ममता म्हणाल्या- आमची आघाडी जनतेशीच
- “पूर्वोत्तर अब ना दिल से और ना ही दिल्ली से दूर” तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपाच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींचे विधान!