• Download App
    प्रॉव्हिडंट फंडच्या खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ|Deadline for linking Aadhaar to Provident Fund account extended till 31st December

    प्रॉव्हिडंट फंडच्या खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यां ना ३१ डिसेंबरपर्यंत लिंक करता येणार आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती.Deadline for linking Aadhaar to Provident Fund account extended till 31st December



     

    अशी आहे प्रक्रिया?

    • सर्वात आधी EPFO पोर्टल epfindia.gov.in वर जा
    • UAN आणि पासवर्ड वापरुन आपल्या खात्याला लॉग इन करा
    • “Manage” विभागात KYC पर्यायावर क्लिक करा.
    • यानंतर उघडलेल्या पेजवर आपण आपल्या EPF खात्याशी जोडलेले अनेक कागदपत्रे पाहू शकता.
    • यानंतर आधारचा पर्याय निवडा आणि आधार कार्डवर असलेले तुमचे नाव टाईप करून save वर क्लिक करा.
    • तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल. तुमचे आधार UIDAI च्या डेटासोबत व्हेरिफाईड केले जाईल.
    • तुमचे KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार कार्ड लिंक होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या आधार तपशीलांसमोर “Verify” लिहून येईल.

    जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत EPFO आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. या व्यतिरिक्त तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. जर EPF खातेधारकाचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO च्या सेवा वापरू शकता येणार नाही.

    Deadline for linking Aadhaar to Provident Fund account extended till 31st December

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे