• Download App
    बक्सरपाठोपाठ आता गाझीपूरमध्येही गंगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती|Dead bodied found in Ganga river once again

    बक्सरपाठोपाठ आता गाझीपूरमध्येही गंगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर भारतात ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ लागला असून मृतांची संख्याही वाढत चालली आहे.Dead bodied found in Ganga river once again

    अनेक ठिकाणांवर अंत्यसंस्कारासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मृतदेह तसेच गंगेच्या पाण्यात सोडले जात असून महामारीचा संसर्ग आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



    ग्रामीण भागांत अंत्यसंस्काराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे मृतदेह तसेच गंगेच्या पाण्यात सोडले जातात. यामुळे कोरोनाबरोबरच अन्य आजारांचा फैलाव होण्याचाही धोका वाढला आहे.

    कालच येथून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिहारमधील बक्सर येथे गंगेच्या पात्रात शेकडो अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले होते.

    हे सगळे मृतदेह उत्तरप्रदेशातून आल्याचा आरोप बिहारमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. उत्तरप्रदेशातच मृतदेह गंगेमध्ये सोडण्याची प्रथा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

    बक्सरमधील घटनेची गंभीर दखल घेत जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बक्सरमधील घटना दुर्दैवी असून त्याची चौकशी झालीच पाहिजे. हा माता गंगेच्या स्वच्छतेचा प्रश्न् असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Dead bodied found in Ganga river once again

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही