• Download App
    आणखी एक लस : मॉडर्नाच्या लसीला डीजीसीआयकडून लवकरच मंजुरी, सिप्ला करू शकते आयात । DCGI May Consider Cipla To Import Moderna Vaccine Shortly Says Government Source

    Moderna Vaccine : मॉडर्नाच्या लसीला डीजीसीआयकडून लवकरच मंजुरीची शक्यता, सिप्ला करू शकते आयात

    Moderna Vaccine : देशात कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात लसीकरण अधिक तीव्र करण्यावर जोर देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लवकरच परदेशी लसही देशात आयात केली जाऊ शकते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) लवकरच सिप्लाला मॉडर्नाची लस आयात करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. DCGI May Consider Cipla To Import Moderna Vaccine Shortly Says Government Source


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात लसीकरण अधिक तीव्र करण्यावर जोर देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लवकरच परदेशी लसही देशात आयात केली जाऊ शकते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) लवकरच सिप्लाला मॉडर्नाची लस आयात करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.

    अमेरिकन लस कंपनी मोडर्नाने आपल्या कोविड-19 अँटी लसीसाठी नियामकांना मान्यता मागितली आहे. सिप्ला कंपनीने लस आयात, विक्रीच्या अधिकृततेसाठी अर्ज केला आहे. असे सांगितले जाते की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया 18 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी ‘मॉडर्ना’ या अँटी-कोविड लसीला तातडीच्या वापरासाठी मान्यता देऊ शकते.

    ही लस जगातील अनेक विकसित देशांमध्ये वापरली जात आहे. या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत १२ कोटी लोकांना फायझर किंवा मॉडर्नाची लस देण्यात आली असून या लसीच्या दुष्परिणामांविषयी चिंता करण्याचे कोणतीही कारण समोर आलेले नाही.

    यापूर्वी, दिल्ली सरकारनेही केंद्र सरकारला फाइझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या आंतरराष्ट्रीय लसींची परवानगी देण्याचे आवाहन केले होते. मोडर्नाची लस मेसेंजर आरएनएवर अवलंबून आहे, जी कोशिकांना विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी तयार करते.

    या लसीसंदर्भात घेण्यात आलेल्या क्लिनिकल चाचण्यांचे परिणाम दर्शवितात की, कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या प्रकरणांमध्ये ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. याशिवाय राष्ट्रीय टास्क फोर्सचे प्रमुख व्हीके पॉल यांनीही असे म्हटले आहे की, सरकार सातत्याने लस उत्पादकांशी संपर्कात आहे.

    DCGI May Consider Cipla To Import Moderna Vaccine Shortly Says Government Source

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!