वृत्तसंस्था
बंगळूर : केवळ दोन दिवसांत ओला इलेक्ट्रिक कंपनीने ११०० कोटींच्या स्कुटरची विक्री करून ई-कॉमर्स क्षेत्रात नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. Day 2 of EV era was even better than Day 1! Crossed ₹1100Cr in sales in 2 days!
ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने स्कुटरची विक्री थांबवावी लागली. ओला इलेक्ट्रिकने बुधवारी सकाळी एस १ श्रेणीच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ऑनलाइन विक्रीला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ६०० कोटींची विक्री तर दुसऱ्या दिवशी ५०० कोटींच्यास्कूटरची विक्री केली. कंपनीची दोन दिवसांची विक्री ११०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
कंपनीने आता स्कूटरची विक्री थांबवली असून १ नोव्हेंबरला विक्री सुरू होईल. यावर्षी दिवाळीचा ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ओला इलेक्ट्रिकने ओला एस १ आणि ओला एस १ प्रो या नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनलाइन विक्री सुरू केली. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने हाताळली जाईल. स्कूटर १० रंगांमध्ये उपलब्ध असून १,००० शहरांमध्ये ओलाद्वारे थेट वितरित केल्या जातील.
Day 2 of EV era was even better than Day 1! Crossed ₹1100Cr in sales in 2 days!
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले