• Download App
    दाऊदवर विष प्रयोग, तो मेला; पण ही बातमी पाकिस्तान करेलच कशी "कन्फर्म"??|Dawood was poisoned, he died; But how will Pakistan "confirm" this news??

    दाऊदवर विष प्रयोग, तो मेला; पण ही बातमी पाकिस्तान करेलच कशी “कन्फर्म”??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तानातल्या कराची विष प्रयोग झाला आणि तो मेला. पण पाकिस्तानने ही बातमी “कन्फर्म” केलेली नाही. वेगवेगळ्या सोर्सेस म्हणून ही बातमी भारतात पोहोचली. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली पण कोणत्याही अधिकृत सूत्रांनी ती बातमी “कन्फर्म” केली नाही.Dawood was poisoned, he died; But how will Pakistan “confirm” this news??

    भारतातली माध्यमे पाकिस्तानी सरकार दाऊद मेल्याची बातमी “कन्फर्म” करण्याची वाट पाहात आहेत. पण मूळात दाऊद मेला ही बातमी पाकिस्तान “कन्फर्म” तरी कशी काय करू शकेल?? कारण पाकिस्तानने म्हणजेच पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी आयएसआय या गुप्तहेर संघटनांनी दाऊदचे पाकिस्तान मधले “अस्तित्वच” आत्तापर्यंत नाकारले आहे. अगदी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्यापासून ते सध्याच्या काळजीवाहू सरकार पर्यंत कुठल्याही सरकारने दाऊद पाकिस्तानात असल्याचे “सत्य” कधीच स्वीकारले नाही.



    1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निमंत्रणावरून पाकिस्तानी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याच्या वेळी दाऊद काही काळासाठी पाकिस्तान सोडून दुबईला गेल्याची “कन्फर्म” बातमी त्या वेळच्या माध्यमांनी दिली होती, पण त्यानंतर पाकिस्तानने कधीही दाऊद इब्राहिम पाकिस्तानात कराचीच्या क्लिफ्टन रोडवर राहतो ही बातमी “कन्फर्म” केली नव्हती. त्यामुळे दाऊद इब्राहिमला पाकिस्तानात विष प्रयोग झाला आणि तो मेला ही बातमी पाकिस्तान कधीही “कन्फर्म” करणार नाही. त्यामुळे तिची वाट पाहण्यात काही मतलब नाही.

     अज्ञात व्यक्तींकडून विषप्रयोग

    पण त्या पलीकडे जाऊन गेल्या वर्षभरातल्या भारतीय गुप्तहेर संघटना रिसर्च अँड अनालिसिस विंग “रॉ” च्या काही ऍक्टिव्हिटी पाहिल्या तर ही बातमी वेगळ्या मार्गाने “कन्फर्म” होऊ शकते. गेल्या वर्षभरामध्ये पाकिस्तान सह वेगवेगळ्या देशांमध्ये भारतात दहशतवादी कृत्य करून पळून गेलेले अनेक वॉन्टेड दहशतवादी अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या घालून मारले गेले आहेत. या “अज्ञात व्यक्ती” कुणालाच सापडायला तयार नाहीत. नेमके कोणी?? कसे आणि का??, मारले याचा शोध पाकिस्तानातले पोलीस, लष्कर किंवा अन्य कुठलीही तपास संस्था घेऊ शकलेली नाही. त्यामुळे दाऊदच्या बाबतीत झालेला विष प्रयोग हा असाच “अज्ञात व्यक्तीने” केल्याचे मानण्यात येत आहे. पण ही बातमी पाकिस्तान “कन्फर्म” करण्याची शक्यता नाही.

    त्यावर पाकिस्तानी माध्यमांमध्ये दाऊद मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशीच बातमी फिरते आहे. दाऊद ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्या भोवतीची सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतली आहे आणि दाऊदला ज्या मजल्यावर ऍडमिट केले आहे त्या मजल्यावरचे सर्व पेशंट्स इतरत्र हलवून तो मजला पूर्ण मोकळा केल्याची बातमी आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बातमी ही पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा दोन दिवस बंद होती.

    त्यामुळे पाकिस्तानी माध्यमांनी देखील दाऊट ऍडमिट असल्याची बातमी देखील त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. यापलीकडे पाकिस्तान मधल्या बातमीचे कोणतेही “कन्फर्मेशन” नाही, पण दाऊदवर विष प्रयोग झाला. तो “अज्ञात व्यक्तीने” केला आणि तो काल रात्री 1.00 वाजता मेला, एवढीच “कन्फर्म” बातमी भारतात पोहोचली आहे!!

    Dawood was poisoned, he died; But how will Pakistan “confirm” this news??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट