मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन, आरोपी अटक!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल केला होता, त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. Dawood gang conspiracy to kill PM Modi and CM Yogi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हत्येचा कट रचण्याची सूचना दाऊद गँगने दिल्याचा दावा अटक केलेल्या व्यक्तीने केला आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, फोन करणाऱ्या आरोपीने जेजे रुग्णालयालाही लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. जेजे रुग्णालय हे मुंबईतील सर्वात प्रमुख रुग्णालयांपैकी एक आहे. आरोपी व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dawood gang conspiracy to kill PM Modi and CM Yogi
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार बनताच 4 टक्के मुस्लीम आरक्षण हटवले जाईल’, तेलंगणात गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
- अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर यांची विश्वचषकाबाबत पोस्ट व्हायरल!
- ‘हिंदू राष्ट्रा’साठी संविधानात दुरुस्ती करा, धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांची मागणी!
- महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या रूपात अण्णा हजारे नव्हे, तर पवारांसाठी शरद जोशी + दत्ता सामंत यांच्या बफर नेतृत्वासारखा प्रयोग!!