क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो कप-2020 च्या पत्रकार परिषदेत त्याच्यासमोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या काढल्या. यामुळे कोका-कोलाचे करोडोंचे नुकसान झाले होते. आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डो बनण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. David Warner recreates Ronaldo’s Coca-Cola stunt at press conference
वृत्तसंस्था
दुबई : क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो कप-2020 च्या पत्रकार परिषदेत त्याच्यासमोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या काढल्या. यामुळे कोका-कोलाचे करोडोंचे नुकसान झाले होते. आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डो बनण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
डेव्हिड वॉर्नरसमोर कोका-कोलाच्या दोन बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याने दोन्ही बाटल्या उचलल्या आणि तिथून काढण्याचा प्रयत्न केला, पण समोर बसलेल्या आयसीसीच्या अधिकाऱ्याने त्याला तसे करू दिले नाही. यादरम्यान वॉर्नर म्हणाला, ‘मला हे इथे ठेवावे लागेल. जर ते रोनाल्डोसाठी योग्य असेल तर ते माझ्यासाठीही चांगले आहे.
वॉर्नर फॉर्ममध्ये परतला
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आयपीएल फेज-2 आणि सराव सामन्यांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या बॅटला धावा मिळाल्या नाहीत, मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 65 धावांची शानदार खेळी केल्याने हा स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परतला आहे.
दरम्यान, शीतपेयांना विरोध करणारा डेव्हिड वॉर्नर पहिला खेळाडू नाही. जगातील अनेक खेळाडू शीतपेयांना विरोध करत आहेत. शीतपेये आरोग्यासाठी चांगली नसल्याचेही अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
David Warner recreates Ronaldo’s Coca-Cola stunt at press conference
महत्त्वाच्या बातम्या