- जोडीदाराचा फोटो शेअर करत चाहत्याला दिली बातमी ..
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या यशाच्या शिखरावर आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे.. या कार्यक्रमांसोबत या कार्यक्रमात सहभागी होणारे कलाकारही आता घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे तेही कायम त्यांच्या प्रत्येक कृतीमुळे चर्चेत असतात. माध्यमांच आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमातील प्रत्येकाला मिळतं आहे.Dattu More of Maharashtras Hasya Jatra program got married
या कार्यक्रमात आवलिया कलाकार असणारा दत्तू मोरे नुकताच विवाह बंधनात अडकला असून, त्याने त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत. चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे..
23 मे रोजी दत्तूने कोर्ट मॅरेज करत आपली लग्नगाठ बांधली. यापूर्वी प्री-वेडिंग शूटचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले असता प्रेक्षकांना दत्तूच्या लग्नाची चाहूल लागली होती. दत्तूने आपली पत्नी स्वाती सोबतचा फोटो शेअर करत “नवा सोबती नवी सुरुवात आशीर्वाद असू द्या”. असं म्हटलंय.
दत्तूने आजवर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात वेगवेगळ्या स्कीटमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून आणि परीक्षकांकडून भरपूर भरपूर दाद मिळाली आहे.
Dattu More of Maharashtras Hasya Jatra program got married
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची चिन्ह; TMC-CPI ने केली घोषणा
- पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत वक्तव्यावरून केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, गुजरात कोर्टाने जारी केले समन्स
- राहुल गांधींनी नवीन पासपोर्टसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा, एनओसी देण्याची केली विनंती
- सावरकर पोर्ट्रेट ते सावरकर जयंती दिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन; लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या विरोधकांच्या बहिष्काराचा असहिष्णू पायंडा!!