विशेष प्रतिनिधी
बंगलोर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप आणि इथल्या परंपरा मातीशी जोडलेला दारा शुकोह हे भारताचे आयकॉन होऊ शकतात. औरंगजेबासारखा परकीय आक्रमक स्वतंत्र भारताचा आयकॉन होऊ शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी मांडली. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगलोरात झाली. त्यानंतर दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
दत्तात्रय होसबळे म्हणाले :
दिल्लीमध्ये औरंगजेब रोड होता, त्याचे नामांतर करून त्याला अब्दुल कलाम रोड असे नाव दिले त्यामागे निश्चित काहीतरी धोरण आहे ना. आपण परकीय आक्रमणकर्त्यांची मानसिकता सोडण्याची गरज या नामांतरातून पूर्ण केली.
गंगा जमनी तहजीबच्या जे बाता मारतात, त्यांनी औरंगजेबाला पुढे आणले. दारा शुकोहला पुढे आणले नाही. भारतावर आक्रमण केलेल्यांना “आयकॉन” बनवायचे त्यांचे धोरण दिसते. पण दारा शुकोह भारताच्या संस्कृतीशी इथल्या मातीशी आणि परंपरांशी जोडले गेले. त्यांना आयकॉन म्हटले पाहिजे.
हा विषय केवळ धर्माचा नाही, तर भारतातली संस्कृती, परंपरा आणि माती याच्याशी संबंधित विषय आहे. भगिनी निवेदिता इथे आल्या, त्या ख्रिश्चन असल्या तरी इथल्या धर्म परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडल्या गेल्या.
इंग्रजांबरोबर भारताने स्वातंत्र्य युद्ध लढले. पण त्याआधी देखील देशात परकीय आक्रमकांविरुद्ध स्वातंत्र्य युद्धे झालीच. महाराणा प्रताप यांनी लढलेले युद्ध हे स्वातंत्र्य युद्धच होते. कारण त्यांनी परकीय आक्रमकांविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे महाराणा प्रताप भारताचे “आयकॉन” होऊ शकतात परकीय आक्रमक औरंगजेब हा स्वतंत्र भारताचा “आयकॉन” होऊ शकत नाही.
Dattatreya Hosabale, says There have been a lot of incidents in the past
महत्वाच्या बातम्या
- शिक्षणाचे खासगीकरण करून प्रायव्हेट कॉलेजेस काढली काँग्रेसच्या नेत्यांनी, पण आता राहुल गांधी + सुखदेव थोरातांनी वकालत केली पब्लिक एज्युकेशन सिस्टीमची!!
- JP Nadda ‘’लोकसभेतील अनेक खासदार ‘ओव्हर वेट’ आहेत, तपासणी झाली पाहिजे’’
- foreign jails : १० हजारांहून अधिक भारतीय परदेशी तुरुंगात; ४९ जणांना मृत्युदंड सुनावला गेला
- Amit Shah ‘३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादापासून मुक्त होईल’