वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधील लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स रेस्टो-बारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ड्रिंक्स पार्टीमध्ये रामानंद सागर यांच्या टीव्ही शो रामायणची रीमिक्स क्लिप संगीतासह वाजवली जात होती.Dance video viral on Ramayana remix in bar, FIR filed by police itself; Bar co-owner, manager arrested
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नोएडा पोलिसांनी स्वत:हून याप्रकरणी एफआयआर नोंदवला. यानंतर पोलिसांनी गार्डन गॅलेरियातील लॉर्ड ऑफ ड्रिंक्स बारच्या को-ओनर आणि व्यवस्थापकाला अटक केली.
श्रीराम-रावण युद्ध दृश्यावर रिमिक्स
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक नाचताना आणि गाताना दिसत आहेत. त्यांच्या मागे रामायण मालिकेतील श्रीराम-रावण युद्धाचे दृश्य मोठ्या पडद्यावर दिसते. यात दोघांचे संवाद पुढे-मागे वाजवले गेले, सोबतच वेगवान संगीतही वाजत राहिले.
नोएडाचे डीसीपी शक्ती अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणावर कारवाई करत सेक्टर 39 पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. यानंतर को-ओनर माणक अग्रवाल आणि व्यवस्थापक अभिषेक सोनी यांना अटक करण्यात आली आहे, तर डीजे सध्या चेन्नईत आहे.
तिघांवरही IPC कलम 153A (सद्भावना किंवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे कृत्य) आणि 295 (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाची विटंबना करणे किंवा नुकसान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर युजर्सनी नोएडा पोलिसांना केले टॅग
ट्विटरवर व्हिडिओ क्लिप शेअर करताना युझरने यूपी पोलिस तसेच नोएडा पोलिसांना टॅग केले. तसेच नोएडामध्ये हा व्हिडिओ खुलेआम चालवला जात असून हिंदू धर्माची खिल्ली उडवली जात असल्याचेही लिहिले आहे. यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा अघटित घडल्यास ते (रेस्टो-बार) जबाबदार असतील, असा इशारा दिला होता.
Dance video viral on Ramayana remix in bar, FIR filed by police itself; Bar co-owner, manager arrested
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी – तृणमूळ – कम्युनिस्ट : संकुचित दृष्टी, आकुंचित पक्ष; राष्ट्रीय दर्जापासून ढळले नेतृत्व!!
- कर्नाटक भाजपकडून स्टार कँपेनर्सच्या डिमांडमध्ये योगी, जयशंकर, हेमंत विश्वशर्मा टॉपवर; जयशंकर तर सरप्राईज एलिमेंट!!
- पवार, ममतांचा गेला राष्ट्रीय दर्जा; काँग्रेससाठी आले आनंदाचे भरते
- मुलींसाठी वरदान ठरलेल्या सुकन्या समृद्धी योजनेतून अधिक लाभ मिळणार; मोदी सरकारने वाढवला व्याज दर!