• Download App
    दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक । Dalit leader Jignesh Mewani arrested

    दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : काँग्रेसचे वडगामचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली. मेवाणी यांच्या टीमशी संबंधित एका कार्यकर्त्याने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आमच्याशी शेअर केलेली नाही. त्याच्यावर आसाममध्ये काही गुन्हे दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे, असे त्याने म्हटले आहे. Dalit leader Jignesh Mewani arrested



    मिळालेल्या माहितीनुसार, मेवानी यांना रस्त्याने अहमदाबादला नेण्यात आले, तेथून त्यांना रेल्वेने आसाममधील गुवाहाटी येथे नेण्यात येणार आहे.

    जिग्नेश मेवाणींनी दुसरेच कारण सांगितले

    मेवाणी म्हणाले की, कदाचित माझ्या एका ट्विटच्या संदर्भात मला अटक करण्यात आली आहे. मात्र, या अटकेमागचे नेमके कारण मला अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे, काँग्रेस नेते जगदीश ठाकोर यांनी मेवाणींच्या अटकेबाबत सांगितले की, जिग्नेश यांच्याविरोधात आरएसएसवर ट्विट केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. आमदाराला धमकावण्याचा हा प्रयत्न आहे.

    मेवाणी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मेवाणीच्या समर्थकांना या अटकेची माहिती मिळताच सर्वांनी अहमदाबाद विमानतळ गाठून आसाम पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

    Dalit leader Jignesh Mewani arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी