• Download App
    Ayodhya अयोध्येत दलित तरुणीवर अत्याचार; डोळे फोडले:

    Ayodhya : अयोध्येत दलित तरुणीवर अत्याचार; डोळे फोडले:3 दिवस बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला

    Ayodhya

    वृत्तसंस्था

    अयोध्या : Ayodhya  उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय अनुसूचित जातीच्या तरुणीचा मृतदेह शनिवारी नग्न अवस्थेत आढळला. मृतदेहाची स्थिती भयावह होती. तरुणीच्या डोळ्यांना इजा करण्यात आली होती आणि शरीरावर अनेक जखमा होत्या. कुटुंबीयांनी अमानुष हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस अधिकारी आशुतोष तिवारी यांनी सांगितले की, तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार शुक्रवारी नोंदली.Ayodhya

    सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहून मृतकाची मोठी बहीण आणि गावातील दोन महिला बेशुद्ध झाल्या. तरुणी गुरुवारी रात्री धार्मिक कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. ती परतली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. शुक्रवारी अयोध्या पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. कुटुंबीयांनी आरोप केला की, पोलिसांनी शोध घेतला नाही. शनिवारी सकाळी तरुणीच्या भावजीला तिचा मृतदेह गावापासून अर्धा किमी अंतरावर एका छोट्या कालव्यात सापडला.कुटुंबीयांनी सांगितले की, तरुणीच्या डोळ्यांना इजा करण्यात आली होती आणि अनेक हाडे तुटलेली होती.



    दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत सप खासदार नाटक करत असल्याचे सांगत कायदा आपले काम करेल, असे सांगितले.

    न्याय न मिळाल्यास राजीनामा देऊ : सप खासदार

    रविवारी माध्यमांशी बोलताना अयोध्याचे सपा खासदार अवधेश प्रसाद भावुक झाले. मंचावर पत्रकार परिषदेदरम्यान ते रडू लागले. त्यांनी म्हटले की, मी पंतप्रधान मोदींशी बोलणार आहे. न्याय मिळाला नाही तर मी राजीनामा देईन. आम्ही मुलींच्या सुरक्षेत अपयशी ठरत आहोत. त्याचवेळी, यूपीचे मंत्री मयंकेश्वर शरण सिंह म्हणाले की, ते फक्त मगरीचे अश्रू ढाळत आहेत.

    Dalit girl raped in Ayodhya; Eyes gouged out Body of missing girl found after 3 days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’