• Download App
    डेली हंट सर्वेक्षण, 77 लाख सँपल साईज; नरेंद मोदींचा स्कोअर 64 %, राहुल गांधींचा 21.8 %...!!|Daily Hunt survey, 77 lakh sample size

    डेली हंट सर्वेक्षण, 77 लाख सँपल साईज; नरेंद मोदींचा स्कोअर 64 %, राहुल गांधींचा 21.8 %…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठ्या सँपल साईजच्या “ट्रस्ट ऑफ नेशन” सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे. सर्वेक्षणात तब्बल 64 % लोकांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नावाला पसंती दिली आहे.Daily Hunt survey, 77 lakh sample size

    डेली हंटने 11 भाषांमध्ये केलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या सर्वेक्षणात एकूण 77 लाख लोकांचा सँपल साईज होता.



     सर्वेक्षण निकाल

    • पंतप्रधान मोदीच हवेत : 64 %
    •  एनडीएला बहुमत : 63 %
    •  5 पैकी 3 जणांचा नरेंद्र मोदींनाच कौल, राहुल गांधींना फक्त 21.8 % लोकांची पसंती
    •  दिल्लीत पंतप्रधान मोदी 57.7 % मतांसह आघाडीवर, राहुल गांधींना 24.2 %
    • उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींना 78.2 % मते, तर राहुल गांधी यांना 10 % मते, योगी आदित्यनाथ 13.7 % मते
    •  पश्चिम बंगालमध्ये मोदींना 62.6 % मते, तर राहुल गांधींना 19.6 % आणि ममता बॅनर्जी यांना 14.8 % मते
    • दक्षिणेत कांटे की टक्कर
    • तामिळनाडूत राहुल गांधींना 44.1 % मते, नरेंद्र मोदींना 43.2 % पाठिंबा
    • केरळमध्ये मोदींना 40.8 % आणि राहुल गांधींना 40.5 % मते.
    •  तेलंगणात नरेंद्र मोदींना 60.1 % मते, तर राहुल गांधी यांना 26.5 % मते, तर एन. चंद्राबाबू नायडू 6.6 % मतांनी पिछाडीवर
    • आंध्र प्रदेशात पंतप्रधान मोदींना 71.8 % मते, तर राहुल गांधी यांना 17.9 % मते, तर एन. चंद्राबाबू नायडू यांना केवळ 7.4 % मते

     कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान

    64 % लोकांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या परराष्ट्र व्यवहार हाताळण्याला खूप चांगले रेटिंग दिले आहे, तर 14.5 % लोकांचा विश्वास आहे की ते अधिक चांगले करू शकतात. 53.8 % लोकांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आहे, तर 24.9 % लोक नाराज आहेत.

    Daily Hunt survey, 77 lakh sample size

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TMC MLA Jivan Krishna Saha : शालेय भरती घोटाळ्यात TMC आमदाराला अटक; ED अटकेसाठी आल्यानंतर भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला

    Prashant Kishor : प्रशांत किशोर म्हणाले- आधी काँग्रेस-लालू आणि आता नितीश, तरीही तुमचे जीवन सुधारले नाही

    Narendra Modi : PM मोदींची DU ची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही; दिल्ली हायकोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश रद्द केला