• Download App
    'खूप झालं, भारताविरोधातील 'बकवास' आता संपली पाहिजे' Daily Express Assistant Editor Sam Stevens says Enough anti India bullshit must stop now

    ‘खूप झालं, भारताविरोधातील ‘बकवास’ आता संपली पाहिजे’

    ब्रिटनच्या नामांकित वृत्तपत्राच्या सहायक संपादकाने व्यक्त केले मत, जाणून घ्या काय म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात सध्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. म्हणजे लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आतापर्यंत निवडणुचे चार टप्पे झाले असून पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. भारतामधील या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे. कारण, भाजप आणि सत्ताधारी एनडीए आघाडीने नरेंद्र मोदीना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कंबर कसली आहे. तर विरोधी पक्षांनी मोदींना सत्तेतून पायउतर व्हायला लावण्यासाठी इंडी आघाडीची स्थापन केली आहे. Daily Express Assistant Editor Sam Stevens says Enough anti India bullshit must stop now

    एकूणच भारतामधील या राजकीय घडामोडींची सर्वांनाच उत्सुकता आहे. या दरम्यान विविध प्रसारमाध्यमं जास्तीत जास्ती सखोल वार्तांकन करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. यामध्ये स्थानिक मीडियापासून ते आंतरराष्ट्रीय मीडियाचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील निवडणुकीचे कव्हरेज करण्यासाठी ब्रिटनहून आलेल्या एका नामांकीत वृत्तपत्राच्या सहायक संपादकांनी भारताबाबतचे त्यांचे मत मांडले आहे.

    युनायटेड किंगडमचे वृत्तपत्र डेली एक्स्प्रेसचे सहायक संपादक सॅम स्टीव्हन्स म्हणतात, मला वाटतं की आता वेळ आली आहे की, भारतावरील टीका खूप झाली. भारतविरोधीतील ‘बकवास’ संपली पाहीजे. आपल्याला येथे येऊन नव्या भारताच्या खरी, सकारात्मक गोष्टी ऐकयाला पाहिजेत. दुर्दैवाने, लंडन आणि संपूर्ण युरोपात पसरलेल्या अनेक गोष्टी भारताबाबत नकारात्मकतेतून आहेत.

    आम्ही येथील धार्मिक विभाजनाबाबत ऐकतो. परंतु वस्तूस्थिती अजिबात अशी दिसली नाही. आम्ही नरेंद्र मोदींच्या सभेला बुरखा परिधान केलेल्या मुस्लीम महिलांना सुद्धा बघितलं आहे. आम्ही या महान आणि अद्भूत राष्ट्राच्या बहुलवादाचे उदाहरण बघितले आहे. आम्ही या राष्ट्राबाबत ब्रिटिश मीडियाचे कव्हरेज उत्कृष्ट बनवण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही सत्य जाणून घेण्यास आणि काही वास्तवादी तथ्य शोधण्यास व ते लंडनला घेऊन जाण्यास इथे आलो आहोत.

    Daily Express Assistant Editor Sam Stevens says Enough anti India bullshit must stop now

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य