विशेष प्रतिनिधी
आज लक्ष्मीपूजन गेल्या एक हजार वर्षांच्या भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली. मूळ भारतीय वंशाचे नेते ऋषी सूनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत. ते 10 डाऊनिंग स्ट्रीट पर्यंत पोहोचले आहेत. कारण पंतप्रधान पदाचे त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षा आता फार मागे पडले. Dadabhai Naoroji to Rishi Soonak; A journey of a century
शिवाय माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय वंशाचे नेते ब्रिटनचे पंतप्रधान बनणे ही गेल्या 1000 वर्षातल्या इतिहासातील फार मोठी घटना ठरली आहे. ज्या भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्षे गुलामी लादली, त्याच भारतीयांचा वंशज आता ब्रिटनच्या लोकशाहीच्या सर्वोच्च स्थानावर बसणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रख्यात उद्योगपती नारायण मूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई आहेत.
अर्थात ब्रिटिश लोकशाहीत भारतीयांची वाटचाल ही 100 वर्षांपेक्षा अधिक मोठी आहे. त्याची पायाभरणी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया अर्थात पितामह दादाभाई नौरोजी यांच्यापासून सुरू होते. दादाभाई 1894 मध्ये भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश खासदार बनले. ब्रिटनच्या पार्लमेंट मध्ये पोहोचणारे ते पहिले भारतीय नेते होते. फिन्सबरी मतदार संघातून 1894 मध्ये अवघ्या 5 मतांनी ते हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून गेले.
त्यानंतर भारतीयांचा ब्रिटिश लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधित्वाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्यानंतर बॅरिस्टर शापूजी सकालतवाला, मनशेरजी भुवनजी यांना देखील ब्रिटिश पार्लमेंट मध्ये खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हेच ते शापूरजी सकालतवाला होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या ब्रिटन मधल्या 13 महिन्यांच्या वास्तव्यात त्यांना वकिली मदत केली होती. लोकमान्य तेव्हा चिरोल केस संदर्भात ब्रिटनला गेले होते. त्यावेळी सर्व व्यवस्था सकालत वाला यांनी केली होती. लोकमान्यांच्या सन्मानार्थ सकालतवाला यांनी आपल्या आलिशान निवासस्थानी ब्रिटिश खासदार आणि नोकरशहांना एक हाय टी पार्टी देखील दिली होती.
त्यानंतर सकालतवाला हे 1922 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य बनले. भारतीयांनी ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य बनण्याचा सिलसिला त्यानंतर कायमच सुरू राहिला. लॉर्ड मेघनाथ देसाई हे तर ब्रिटनच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अर्थात हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य बनले. त्यांच्यानंतर लॉर्ड कीथ वाझ हे देखील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य बनले.
1990 च्या दशकानंतर भारतीयांचा ब्रिटनमधला प्रभाव अधिक वाढत गेला आणि बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात गृह, अर्थ आणि व्यापार ही तीनही खाती भारतीय वंशांच्या नेत्यांकडे आली. प्रीती पटेल या ब्रिटनच्या गृहमंत्री बनल्या. ऋषी सुनक अर्थमंत्री बनले, तर आलोक शर्मा यांना व्यापार मंत्री बनवण्यात आले. मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर ऋषी सूनक हे आता ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याची दाट शक्यता आहे. पण ब्रिटिश लोकशाहीत लोकप्रतिनिधित्व ते पंतप्रधानपद हा प्रवास भारतीयांसाठी एका शतकापेक्षाही मोठा आहे.
Dadabhai Naoroji to Rishi Soonak; A journey of a century
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन
- कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!
- नोकरीची संधी : महावितरण विभागात परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज
- CAIT estimate : दिवाळीचा हर्ष, होऊ दे खर्च; भारतीय करताहेत तब्बल 2,50,000 कोटी रुपयांचा आनंद