• Download App
    KN Rajanna राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    नाशिक : एकीकडे राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे मतदार अधिकार यात्रा; त्याचवेळी काँग्रेसच्या आमदाराने बोलून दाखवली कर्नाटकातली पक्षाची हतबलता!!, हा असला राजकीय काय आज एकाच दिवशी घडला. KN Rajanna

    राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा बिहारमध्ये सुरू असून त्यांनी तेजस्वी यादव यांच्याबरोबर मोटार सायकल वरून त्या यात्रेत फेरी मारली. ही यात्रा अररिया गावाकडे पुढे सरकत असताना तिच्यात एक युवक मध्येच घुसला. त्याने वेळ साधून राहुल गांधींचा मुका घेतला. सुरक्षारक्षकाने त्याला ठोका हाणला. त्यामुळे राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा एकदम देशव्यापी चर्चेचा विषय बनली. राहुल गांधींच्या सुरक्षा यंत्रणेत कशी चूक झाली, याच्या बातम्या माध्यमांनी रंगवून दिल्या.

    पण एकीकडे राहुल गांधी असे बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रेत मग्न असताना दुसरीकडे त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटक विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हटली. आपण जन्मजात काँग्रेसी असलो तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये वादळ उठले. कर्नाटक काँग्रेस मधले दोन गट आमने-सामने आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार अशी लढाई रंगली.

    – आमदार राजण्णा यांचा संताप

    मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे समर्थक आमदार के. एन. राजण्णा यांनी शिवकुमार यांच्या वक्तव्यावर टीका केली. शिवकुमार हे वाटेल ते करू शकतात. वाटेल तसे बोलू शकतात. ते संघाची प्रार्थना म्हणू शकतात. अमित शाह आणि सद्गुरु यांच्याबरोबर एकत्र बसू शकतात. प्रयागराज महाकुंभ मेळ्यात जाऊन स्नान करू शकतात. राहुल गांधींना अंबानींचा झगमगाटी विवाह मान्य नसला, तरी डी‌. के‌. शिवकुमार अंबानींच्या घरच्या लग्नाला हजर राहू शकतात. ते काहीही करू शकतात, अशा शब्दांमध्ये आमदार राजण्णा यांनी संताप व्यक्त केला.

    – इंदिरा गांधींचा वचक

    पण राजण्णा यांच्या वक्तव्यातून संतापापेक्षा काँग्रेस पक्षाची हतबलताच समोर आली. एरवी इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याची किंवा उपमुख्यमंत्र्यांची तर सोडाच, एखाद्या स्थानिक आमदाराची किंवा नगरसेवकाची सुद्धा त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन काही राजकीय वक्तव्य किंवा कृती करायची हिंमत नव्हती. कारण इंदिरा गांधींची काँग्रेस पक्षाच्या संघटनेवर जबरदस्त पकड होती. देशातल्या कानाकोपऱ्यातली खबरबात त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत होती. त्यामुळे त्या काँग्रेस पक्षावर पूर्ण वचक ठेवून होत्या. इंदिरा गांधींनी एखाद्याच्या विरोधात राजकीय वक्तव्य केले किंवा कृती केली, की तो संदेश काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायचा. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते देखील इंदिरा गांधींच्या राजकीय वक्तव्य आणि वर्तणुकीशी सुसंगत वागायचे. इंदिरा गांधींच्या विरोधात जाऊन वागायची त्याची हिंमत व्हायची नाही.

    – काँग्रेसची हतबलता

    पण राहुल गांधींच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाचे सगळे फासे उलटे पडले. राहुल गांधींनी कुठल्याही मुद्द्यावर कितीही आदळापट केली, तरी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते राजकीय व्यवहारात आपल्याला हवे तसे वागू लागले. राजकीय सोयीची कृती करू लागले. हेच डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यांमधून आणि कृतीतून पुढे आले. इंदिरा गांधी असत्या, तर त्यांनी शिवकुमार यांना एका झटक्यात काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढले असते. त्यांना राजकीय दृष्ट्या निष्प्रभ करून टाकले असते. शिवकुमार यांचे समर्थक गळपटवून टाकले असते. पण राहुल गांधी तसे काहीच करू शकले नाहीत. ते शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवू शकले नाहीत. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष पदावर देखील दुसरी व्यक्ती नेमू शकले नाहीत. राहुल गांधींनी फक्त शिवकुमार यांच्या इच्छेनुसार त्यांना मुख्यमंत्री केले नाही, पण त्या पदाखेरीज अन्य अधिकार पदांपासून त्यांना वंचितही ठेवू शकले नाहीत. काँग्रेसच्या नेतृत्वाची हीच हतबलता आमदार राजण्णा यांच्या तोंडून बाहेर आली. फक्त ती संतापाच्या रूपाने बाहेर आली.

    D Shivakumar reciting the RSS anthem in the Karnataka Assembly, Congress MLA KN Rajanna says

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक

    Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त

    उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षकाने हाणला ठोका!!