विशेष प्रतिनिधी
बंगळूर : कोरोनावरील लस साऱ्या जगात मोफत दिली जात असताना किमतीची चर्चा होत असलेला भारत हा कदाचित एकमेव देश असेल, अशी टीका कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी केली.D. K. Shivkaumar lashesh on central govt.
रविवारी त्यांनी ट्विट केले. केंद्रातील भाजप सरकारने लसीची किंमत वाढवून अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर आरोग्याची आणीबाणी निर्माण झाली
असताना नफेबाजीला परवानगी मिळता कामा नये. जनतेच्या कल्याणासाठी टाकलेले एक पाऊल म्हणून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस मोफत मिळावी. कर्नाटकमधील भाजप सरकारने लस मोफत देण्याची घोषणा अद्यापही केली नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली.
लसीकरणाचा तपशील लवकरात लवकर जाहीर केला जावा, अशी मागणी करून ते म्हणाले की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर वेगवेगळे असल्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल.
D. K. Shivkaumar lashesh on central govt.
महत्वाच्या बातम्या
- येतेय आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस ! महाराष्ट्रासाठी गुजरातमधून रवाना , स्वतः पीयूष गोयल यांच ट्विट
- मोदींचा हुकमी एक्का मैदानात ! अजित डोभालांचा एक फोन अन् कोरोना लढ्यात अमेरिका देणार भारताची साथ
- संजय दत्तला हत्यारांसाठी मदत करणाऱ्या हनीफच्या हत्तेच्या आरोपातून गँगस्टर छोटा राजनची सुटका
- हुर्रे …! वैज्ञानिकांनी तयार केला ‘ऑक्सिकॉन’, दर मिनिटाला तयार होणार 3 लिटर ऑक्सिजन
- सिंहगड रोड पोलिसांचा कोरोनाच्या जागृतीसाठी गाण्यांचा अनोखा फंडा
- कोरोनामुक्तीसाठी भारतीयांनो लष्कराचा आदर्श घ्या , 81 टक्के लसीकरण ; जवानांवर प्रभावी उपचारही