वृत्तसंस्था
चेन्नई : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले मिचॉंग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, वादळ नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान बापटला येथे दुपारी 1 वाजता धडकले. Cyclone Michong moves north after hitting Andhra coast
IMD च्या म्हणण्यानुसार, लँडफॉल दरम्यान 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसही झाला. वादळ कमकुवत होऊन पुढे सरकले आहे.
या वादळाचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये झाला. दोन्ही राज्यांमध्ये 100 हून अधिक ट्रेन आणि 50 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 29 एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातून 9500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी सांगितले की, वादळामुळे राज्यात 2 दिवसांत 3 महिन्यांचा पाऊस पडला. पावसामुळे चेन्नई शहर जलमय झाले होते. त्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
चेन्नई, तामिळनाडूमध्ये या वादळाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. चेन्नईमध्ये रविवार, ३ डिसेंबर सकाळपासून सुमारे ४००-५०० मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूच्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नईमध्ये 70-80 वर्षांत पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे.
वादळामुळे आतापर्यंत 204 ट्रेन आणि 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 NDRF पथके तैनात आहेत. याशिवाय तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाची जहाजे आणि विमाने स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत.
Cyclone Michong moves north after hitting Andhra coast
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…