• Download App
    चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान|Cyclone destroyed very much on Gujarat coast

    चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरातच्या किनाऱ्याला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. वादळामुळे राज्यात सात जणांचा मृत्यू झाला. हजारो झाडे आणि वीजेच्या खांबांना उखडून टाकत,घरांचे नुकसान करत राजस्थानच्या दिशेने पुढे गेलेले हे वादळ दुपारी पूर्णपणे शांत झाले.Cyclone destroyed very much on Gujarat coast

    वादळाची पूर्व सूचना असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या आदेशानुसार, कोरोना रुग्णालयांमध्ये विशेष सुरक्षा यंत्रणा राबविण्यात आली होती. अनेक रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.



    तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. वादळामुळे सौराष्ट्र, दीव आणि दमणसह अनेक भागांमध्ये रात्रभर पाऊस कोसळला. वाऱ्यांचा वेग प्रचंड होता.

    या वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील अनेक घरांवरील पत्रे उडाले, वीजेचे खांब उखडले गेले. त्यामुळे किनारपट्टीवरील २४३७ गावे अंधारात बुडाली. दिवसभरात जवळपास ५०० गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.

    हजारो वृक्ष मुळापासून उन्मळून पडले. पावसामुळे भावनगरमध्ये तीन आणि राजकोट, पाटण, अमरेली आणि वलसाड जिल्ह्यांत प्रत्येकी एक, अशा सात जणांचा मृत्यू झाला.

    Cyclone destroyed very much on Gujarat coast

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये