Monday, 5 May 2025
  • Download App
    बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती केले नुकसान??; वाचा एनडीआरएफच्या प्रमुखांनी दिलेली माहिती!!|Cyclone Biparjoy cause in Gujarat??; Read the information given by the head of NDRF!!

    बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती केले नुकसान??; वाचा एनडीआरएफच्या प्रमुखांनी दिलेली माहिती!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळा संदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळे समज – गैरसमज पसरवले जात असताना प्रत्यक्षात या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती नुकसान केले आहे??, या संदर्भातली माहिती एनडीआरएफचे प्रमुख महासंचालक अतुल करवाल यांनी दिली आहे.Cyclone Biparjoy cause in Gujarat??; Read the information given by the head of NDRF!!

    बिपरजॉय चक्रीवादळ येण्यापूर्वीच गुजरात मध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. पण चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर जीवित हानी झालेली नाही. त्याआधी 24 जनावरांचा मृत्यू झाला. पण चक्रीवादळ आल्यानंतर 23 लोक जखमी झाल्याची बातमी आहे. त्याचबरोबर 1000 गावातला वीज पुरवठा खंडित झाला आहे.800 झाडे कोसळली आहेत. राजकोट जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळतो आहे. पण अन्यत्र पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.



    बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरात मध्ये झाला आहे पण चक्रीवादळ जसे कमजोर पडेल आणि त्याचा प्रभाव कमी होईल तसा दक्षिण राजस्थान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानात एनडीआरएफने जालौर जिल्ह्यात 1 टीम पाठवली आहे. कर्नाटकात किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या 4 टीम्स आणि महाराष्ट्रात 5 टीम्स कार्यरत आहेत, अशी माहिती देखील अतुल करवाल यांनी दिली आहे.

    बिपरजॉय चक्रीवादळा संदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळे दावे – प्रतिदावे केले जात आहेत. अगदी सॅटॅलाइट पिक्चर्स पासून वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातून लोकांमध्ये अनेक समज – गैरसमज देखील पसरले आहेत. पण केंद्र सरकारने एनडीआरएफच्या टीम्स सर्वत्र तैनात केल्यानंतर त्यांनी जी अधिकृत माहिती केंद्र सरकारकडे पाठवली आहे, त्यातूनच एनडीआरएफचे प्रमुख महासंचालक अतुल करवाल यांनी वर उल्लेख केलेली माहिती दिली आहे.

    Cyclone Biparjoy cause in Gujarat??; Read the information given by the head of NDRF!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    IMF board : भारताने IMF बोर्डातून कार्यकारी संचालकांना काढून टाकले; 6 महिने कार्यकाळ शिल्लक होता

    Waqf Act : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्फ कायद्याच्या विरोधात; हैदराबादेत ‘वक्फ बचाओ, संविधान बचाओ’ मोहीम

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती; 80च्या दशकातील काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार