वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज पेट्रोलचे दर १५ ते २० पैशानी तर डिझेल १८ ते २० पैशांनी कमी झाले आहेत. गेल्या ३५ दिवसात प्रथमच २२ ऑगस्टला इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. Cuts in petrol and diesel prices begin; Fuel became cheaper by 15 to 20 paise across the country
प्रमुख चार शहरातील इंधनाचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल २० पैशांनी कमी झाले असून पेट्रोल हे प्रतिलिटर १०१.६४ तर डिझेल ८९.०७ रुपयांना विकले जात आहे.
दिल्लीसह मुंबई आणि देशातही अशाच पद्धतीने इंधनाचे दर कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोल १०७.६६ रुपये तर डिझेल ९६.९४ रुपयांना मिळत आहे.
कोलकाता येथे पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल १९ पैशांची स्वस्त झाले आहे. पेट्रोल १०१.९३ तर डिझेल ९२.१३ रुपयांना मिळत आहे.
चेन्नईत पेट्रोल १५ पैशांची स्वस्त होऊन ९९.३२ रुपयांना तर डिझेल १८ पैशांची स्वस्त होऊन ९३.६६ रुपयांना मिळत आहे. विशेष म्हणजे तमिळनाडूतील डिएमके सरकारने पेट्रोलवरील करामध्ये ३ रुपयांनी अगोदरच कपात केली आहे.
Cuts in petrol and diesel prices begin; Fuel became cheaper by 15 to 20 paise across the country
महत्त्वाच्या बातम्या
- राजधानी दिल्लीत तब्बल साठ वर्षांनंत झाला प्रचंड विक्रमी पाऊस
- काबूल ठिकठिकाणी तालिबान्यांचा महिलांवर हल्ला, साऱ्या देशात भयाचे वातावरण
- Corona Vaccination: महाराष्ट्रात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण; दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक डोस देणे शक्य असल्याचे स्पष्ट
- अमेरिकेने म्हटले: तालिबानशी हातमिळवणी करण्याचा पाकिस्तानी उद्देश हा भारताशी स्पर्धा करणे