• Download App
    करन्सी नोटा छपाई घोटाळा; यूपीए सरकारचे केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्या घरांवर सीबीआयचे छापे | The Focus India

    करन्सी नोटा छपाई घोटाळा; यूपीए सरकारचे केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने 2016 मध्ये केलेल्या नोटबंदीच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांना सातत्याने घेरत असताना एक महत्त्वाची घडामोडी दिल्ली आणि राजस्थानची राजधानी जयपूर मध्ये घडली आहे. सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारच्या काळातील केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्या घरावर सीबीआयने छापे घातले आहेत. राजधानी नवी दिल्ली आणि जयपूर या दोन शहरांमधल्या निवासस्थानांवर सीबीआयचे अधिकारी छापे घालत आहेत. currency note printing scam; CBI raids the residences of UPA government’s Union Finance Secretary Arvind Mayaram

    अरविंद मायाराम यांच्याबरोबरच रिझर्व्ह बँकेतील काही अधिकारीही सीबीआयच्या रडारवर आहेत. करन्सी नोट छापण्याची टेंडर्स देण्यामध्ये अनियमितता आणि घोटाळा असल्याचा आरोप अरविंद मायाराम आणि रिझर्व्ह बँकेतील काही अधिकाऱ्यांवर आहे.

    अरविंद मायाराम हे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी असून 2012 ते 2014 या दोन वर्षांमध्ये ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात मुख्य सचिव होते. त्यांच्याच काळात करन्सी नोटा छापण्याचे टेंडर देण्यात आले होते आणि त्यामध्ये अनियमितता आणि घोटाळा असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या संदर्भात सीबीआय चौकशी करत आहे. त्यातूनच अरविंद मायाराम यांच्या दिल्ली आणि जयपूर मधल्या घरांवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले आहेत.

    currency note printing scam; CBI raids the residences of UPA government’s Union Finance Secretary Arvind Mayaram

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते