Bajrang Dal activist : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षची हत्या करण्यात आली. याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी सांगितले की, त्यांची हत्या एका षड्यंत्राखाली करण्यात आली आहे. याची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. सरकार ही बाब गांभीर्याने घेईल. गरज पडल्यास हे प्रकरण एनआयएकडे सोपवले जाईल. CT Ravi says conspiracy to kill Bajrang Dal activist, case should be handed over to NIA if need be
वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षची हत्या करण्यात आली. याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी सांगितले की, त्यांची हत्या एका षड्यंत्राखाली करण्यात आली आहे. याची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. सरकार ही बाब गांभीर्याने घेईल. गरज पडल्यास हे प्रकरण एनआयएकडे सोपवले जाईल.
काही जण ताब्यात
याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, अटकेशी संबंधित कोणताही अंतिम अहवाल आम्हाला अद्याप मिळालेला नाही. आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू आहे. लवकरच हत्येशी संबंधित माहिती मिळेल, जी तपासानंतरच सांगता येईल.
कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी जिल्ह्यात हिंसाचार उसळला. यावर राज्याचे गृहमंत्री म्हणाले की, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना परिस्थितीचे विश्लेषण करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर २-३ दिवस विशेष लक्ष द्यावे लागेल.
हत्येसाठी ‘तुकडे-तुकडे गँग’ थेट जबाबदार : गिरीराज सिंह
याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची तीक्ष्ण वक्तव्ये समोर येत आहेत. या हत्येला ‘तुकडे-तुकडे गँग’ थेट जबाबदार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंह यांनी दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, काल रात्री शिवमोगा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षची हत्या करण्यात आली. देशाची अखंडता आणि सभ्यता जपणाऱ्याची धर्मनिरपेक्षतेचा हिजाब घालून तुकडे तुकडे गँगने हत्या केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवणारे गायब आहेत.
हत्येविरोधात बजरंग दलाची रॅली
या तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामधील गोंधळ वाढत चालला आहे. या हत्येविरोधात जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले आहेत. जिल्ह्यात पोलीस यंत्रणाही कडक करण्यात आली आहे.
CT Ravi says conspiracy to kill Bajrang Dal activist, case should be handed over to NIA if need be
महत्त्वाच्या बातम्या
- समाजवादी पक्षाच्या उमेदवारानेही कबूल केले डीएनए एकच, अश्फाक अहमद म्हणाले- आमचेही पूर्वज श्रीराम, आम्ही सर्व हिंदुस्थानी!
- कंगाल पाकिस्तानला आली भारताची आठवण, म्हणाले- शेजारील देशाशी व्यापार करणे काळाची गरज!
- फडणवीसांनी भाजप विरोधकांना टोचत नाशकात सांगितला “दत्तक” शब्दाचा अर्थ…!!
- Airthings Masters Chess Tournament : अभिमानास्पद ! भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद – ३९ चाल -‘वर्ल्ड चॅम्पियन’ मॅग्नस कार्लसनचा पराभव…
- Bird Flu : राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव, ठाणे, पालघरमध्ये कोंबड्यांना लागण, आतापर्यंत २३०० कोंबड्या दगावल्या