क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. आर्यन खानचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही या प्रकरणात जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतरही अरबाज आणि मुनमुन यांना ३० ऑक्टोबरची रात्र तुरुंगात काढावी लागली.Cruise drugs case Munmun Dhamecha also came out of jail, Arbaaz Merchant Will released by evening
प्रतिनिधी
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. आर्यन खानचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही या प्रकरणात जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतरही अरबाज आणि मुनमुन यांना ३० ऑक्टोबरची रात्र तुरुंगात काढावी लागली.
मुनमुन धमेचा रविवारी सकाळी भायखळा कारागृहातून सुटका झाली. मुनमुन धमेचा भायखळा जेलमधून बाहेर आल्यानंतर आता अरबाज मर्चंटही लवकरच आर्थर रोड जेलमधून बाहेर येण्याची शक्यता आहे.
अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी सांगितले की, अरबाज संध्याकाळी बाहेर येईल, आता मी त्याला भेटायला आलो आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही २९ ऑक्टोबरला जामीन मिळाला होता.
आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरुंगातून सुटला आणि मन्नतला पोहोचला, पण या दोघांची सुटका रखडली होती. अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांची सुटका कागदोपत्री पूर्ण न झाल्यामुळे रखडली होती.
30 ऑक्टोबरला अरबाजने वडिलांना विनंती केली होती की, त्याला आज तुरुंगातून बाहेर काढावे. अस्लम यांनीही मुलाला आज सोडण्याची ९० टक्के शक्यता असल्याचे आश्वासन दिले होते, पण तसे होऊ शकले नाही. अरबाज मर्चंट 30 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकला नाही. आता अरबाजची आज तुरुंगातून सुटका होणार आहे. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मुनमुन धमेचाच्या रिलीजलाही विलंब झाला होता.
Cruise drugs case Munmun Dhamecha also came out of jail, Arbaaz Merchant Will released by evening
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द