• Download App
    सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही; किरेन रिजिजू यांच्या निवृत्त न्यायाधीशांवरील वक्तव्यावर वकील संघाची प्रतिक्रियाCriticizing the government is not treason; Lawyers' association reacts to Kiren Rijiju's remarks on retired judges

    सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही; किरेन रिजिजू यांच्या निवृत्त न्यायाधीशांवरील वक्तव्यावर वकील संघाची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत केलेल्या वक्तव्याचा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या वकिलांनी निषेध केला आहे. कायदामंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, काही निवृत्त न्यायाधीश अँटी इंडिया ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. Criticizing the government is not treason; Lawyers’ association reacts to Kiren Rijiju’s remarks on retired judges

    किरेन रिजिजू यांनी दिलेल्या या वक्तव्यावर वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कायदामंत्र्यांचे हे विधान निषेधार्ह असून त्यांना शोभणारे नाही, असे निवेदन त्यांनी जारी केले. कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी असे विधान करून घटनात्मक नियमांचे उल्लंघन केले आहे, असे वकिलांच्या एका गटाने म्हटले आहे. सरकारवर टीका करणे हे देशद्रोही कृत्य नाही किंवा देशाविरुद्ध नाही.


    स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार


    वकिलांनी किरेन रिजिजू यांना त्यांचे म्हणणे मागे घेण्याचे आवाहन

    सुमारे 350 वकिलांनी किरीन रिजिजू यांच्या विधानावर आक्षेप घेत त्यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले आणि भविष्यात अशा प्रकारच्या टिप्पणी न करण्याचा इशाराही दिला.

    किरेन रिजिजू यांचे वक्तव्य…

    कायदामंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, काही निवृत्त न्यायाधीश आहेत जे भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेने विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. ते म्हणाले, देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना याची किंमत चुकवावी लागेल. देशाच्या आत आणि बाहेर राहणार्‍या भारतविरोधी शक्ती देशाची लोकशाही धोक्यात आहे अशाच भाषेत बोलतात. ज्या भाषेत भारतविरोधी बोलतात, तीच भाषा राहुल गांधी बोलतात, ज्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

    Criticizing the government is not treason; Lawyers’ association reacts to Kiren Rijiju’s remarks on retired judges

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!