• Download App
    पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनचा तिळपापड, अमेरिका भारताचा ढाल म्हणून वापर करत असल्याची टीका Criticism that China is using India as a shield because of PM Modi's visit to America

    पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनचा तिळपापड, अमेरिका भारताचा ढाल म्हणून वापर करत असल्याची टीका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेत पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. यासोबतच ते व्हाइट हाऊसमध्ये आयोजित डिनरचाही आनंद घेतील. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनला मिरची झोंबली आहे. चीनचे म्हणणे आहे की, अमेरिकेला भारतासोबतच्या भागीदारीचा फायदा उठवायचा आहे आणि त्याला जागतिक स्तरावर चीनची वाढ थांबवायची आहे. Criticism that China is using India as a shield because of PM Modi’s visit to America

    पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. 2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे, पण त्यांचा हा पहिलाच अमेरिकेचा राजकीय दौरा आहे. चीनचा सामना करण्यासाठी आणि त्याची आर्थिक प्रगती रोखण्यासाठी अमेरिका भारताला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

    अमेरिका भारताचा ढाल म्हणून वापर करतोय – चीन

    ग्लोबल टाइम्समध्ये लिहिले आहे की, फायनान्शिअल टाईम्सने अलीकडेच इशारा दिला की, अमेरिकेला मोदींना जवळ करण्याची किंमत मोजावी लागेल. अमेरिका भारताचा चीनविरुद्ध ढाल म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. चिनी वृत्तपत्राने भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या आर्थिक संबंधांचाही उल्लेख केला आहे.

    ग्लोबल टाइम्सच्या मते, “अमेरिका आणि भारत यांच्यातील आर्थिक आणि व्यापार सहकार्य सध्या वाढत आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्षात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. व्यापाराची गती कायम राहिल्यास त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की अमेरिकेने भारताशी आर्थिक आणि व्यापारिक संवाद वाढवून अनेक भू-राजकीय गणितेदेखील बिघडवली आहेत.

    ‘जागतिक पुरवठा साखळीत चीनची जागा घेता येणार नाही’

    चिनी पेपरने पुढे लिहिले की, “भारतासह आशिया-पॅसिफिक प्रदेशात विद्यमान परस्पर फायदेशीर आर्थिक आणि व्यापार सहकार्य प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्याऐवजी, यूएस तथाकथित इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पेरिटी (IPEF) ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये चीनचा समावेश नाही.”

    ग्लोबल टाइम्सच्या मते, अमेरिकेच्या या प्रयत्नांना वाचा फोडणे अवघड नाही. भारतासोबत आर्थिक आणि व्यापारी सहकार्य बळकट करण्यासाठी अमेरिकेचे जोरदार प्रयत्न हे प्रामुख्याने चीनच्या आर्थिक विकासाला मंदावण्याचे आहेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अमेरिकेचा हा डाव फसला, कारण जागतिक पुरवठा साखळीतील चीनचे स्थान भारत किंवा इतर अर्थव्यवस्था बदलू शकत नाहीत.

    ‘चीनमधून भारताची आयात वाढली’

    2022-23 या आर्थिक वर्षात जिथे भारताची अमेरिकेला निर्यात स्पष्टपणे वाढत आहे, तिथे चीनमधून भारताची आयातही लक्षणीय वाढली आहे. भारतीय आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात अमेरिकेला भारताची निर्यात 2.81 टक्क्यांनी वाढून 78.31 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. या कालावधीत चीनमधून भारताची आयात 4.16 टक्क्यांनी वाढून 98.51 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. चीन हा भारतासाठी सर्वाधिक आयातीचा स्रोत आहे.

    चीनने ग्लोबल टाइम्समध्ये लिहिले, तथ्ये दाखवतात की जागतिक पुरवठा साखळीत भारत चीनची जागा घेऊ शकतो, हे चुकीचे विधान आहे. खरे तर भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार चीनसोबतच्या व्यापाराची जागा घेऊ शकत नाही किंवा जागतिक पुरवठा साखळीत भारत चीनची जागा घेऊ शकत नाही. भारत अमेरिकेला जेवढी निर्यात करतो, तितकी त्याला चीनकडून आयात करावी लागते. जागतिक औद्योगिक सहकार्य राखताना चीन, भारत आणि अमेरिका यांचे समान हितसंबंध आहेत.

    Criticism that China is using India as a shield because of PM Modi’s visit to America

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन!

    Terrorist attack : काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!