• Download App
    डॉ. मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरून टीका - टिप्पण्यांचा 'निवडक माध्यमी' गदारोळCriticism over Mohan Bhagwat's unspoken statement - 'selective medium' uproar of comments

    डॉ. मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरून टीका – टिप्पण्यांचा ‘निवडक माध्यमी’ गदारोळ

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभात देशातल्या जाती आणि वर्ण व्यवस्थेविषयी विशिष्ट भाष्य केले. जाती आणि वर्ण या दोन्ही व्यवस्था इतिहासकालीन असून त्या चुका होत्या हे मान्य करून त्या मागे टाकून समाजाने पुढे गेले पाहिजे, अशा आशयाचे ते वक्तव्य होते. परंतु काही मराठी माध्यमांनी मात्र डॉ. मोहन भागवत यांच्या तोंडी, “ब्राह्मणांनी पापक्षालन केले पाहिजे”, असे वक्तव्य टाकून त्यावर प्रतिक्रिया घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहन भागवत यांनी “असे” वक्तव्य केलेच आहे, असे समजून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी नुसती माफी मागून चालणार नाही, तर समाजाच्या व्यवहारात बदल झाला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या या वक्तव्याला मोठी प्रसिद्धी दिली आहे. Criticism over Mohan Bhagwat’s unspoken statement – ‘selective medium’ uproar of comments

    त्याचबरोबर पुण्यातल्या ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरच ते वक्तव्य केलेच आहे, असे समजून, जे काही पापक्षालन करायचे आहे ते मोहन भागवतांनी करावे ब्राह्मण समाजावर ते लादू नये, असे स्वतःचे वक्तव्य केले आहे.

    मूळात मोहन भागवत यांच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांनी कुठेही ब्राह्मण समाजासह कुठल्याही विशिष्ट समाजाचे नावच घेतलेले नाही. एवढेच नव्हे, तर आपल्या पूर्वजांनी चुका केल्या म्हणून ते पूर्वज निकृष्ट होते असे मानायचेही कारण नाही, असे स्पष्ट मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले आहे. पण मराठी माध्यमांनी मात्र मोहन भागवत यांच्या तोंडी ब्राह्मण समाजाचे नाव घालून त्यावर माध्यमी चर्चा घडवून आणली आहे.

    डॉ. मोहन भागवत यांच्या या भाषणाचा हा व्हिडिओ जसाच्या तसा :

    Criticism over Mohan Bhagwat’s unspoken statement – ‘selective medium’ uproar of comments

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे