विशेष प्रतिनिधी
नांदेड : सध्या महाराष्ट्रात दाखल झालेल्या खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर विविध पक्षांच्या नेत्यांनी टीकेचा भडीमार चालवला आहे. काँग्रेसची यात्रा उद्देशहीन आहे. त्यामुळे तिचा परिणाम शून्य असेल, असे शरसंधान प्रकाश आंबेडकर यांनी साधले होते, तर आपल्या मुलांच्या राजकीय प्रमोशनसाठी काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेचा लाभ करून घेत आहेत, असे टीकास्त्र भाजपच्या नेत्यांनी सोडले आहे. परंतु काँग्रेस नेत्यांवर या टीकेचा काहीही परिणाम होत नसून त्यांनी आपले सगळे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे केंद्र सरकार यावरच केंद्रित केले आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ते अशोक चव्हाण सर्व नेते केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर विशेषतः आर्थिक धोरणांवर कॉन्सन्ट्रेशन करून टीका करताना दिसत आहेत. Criticism on Quit India Yatra over dynasticism, but Congress leaders’ concentration on Modi target
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 16 दिवस महाराष्ट्रात आहे. यातले 3 दिवस उलटून गेले आहेत. आज अर्धापूर येथून भारत जोडो यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. कालच्या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सहभागी झाले होते. यात्रेनंतरच्या जाहीर सभेत देखील त्यांनी सहभाग नोंदवला. या जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठीतून भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणावर टीकास्त्र सोडले. देशाला संविधान काँग्रेसने दिले म्हणून तुम्ही पंतप्रधान बनलात आणि सगळी जुमलेबाजी चालवली आहे, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातून जसे उद्योग गायब झाले आणि गुजरातला गेले तसाच तसेच सर्वसामान्यांना जाहीर केलेले 15 लाख देखील गायब झाले. मोदींनी छोट्या छोट्या वस्तूंवर जीएसटी लावून गरिबांनाही लुटले आहे, असे टीकास्त्र खुद्द राहुल गांधी यांनी सोडले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया हिचा भारत जोडो यात्रेतला सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे, तसेच सुशील कुमार शिंदे यांची कन्या देखील भारत जोडो यात्रेत आहे. त्यामुळे नेत्यांच्या मुलांच्या राजकीय
प्रमोशनसाठी भारत जोडो यात्रेचा लाभ होतो आहे, अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. मात्र त्या टीकेला कन्हैया कुमार यांनी उत्तर दिले आहे. ज्यांना भारताच्या संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांना तिरंग्याचा सन्मान आहे त्या प्रत्येकाला जोडून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे. बाकीचे नेते काय बोलतात याच्याशी भारत जोडो यात्रेला काही देणे घेणे नाही, असे प्रत्युत्तर कन्हैया कुमार यांनी दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेची दखलही काँग्रेस नेत्यांनी घेतलेली दिसत नाही.
एकूण भारत जोडो यात्रेवर जरी वेगवेगळ्या पद्धतीने विरोधक टीकेचा भडीमार करत असले तरी काँग्रेस नेते मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे धोरणे यावर कॉन्सन्ट्रेशन करून टीका करतानाच दिसत आहेत.
Criticism on Quit India Yatra over dynasticism, but Congress leaders’ concentration on Modi target
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांचा खालचा सूर; ईडी विरुद्ध कोणतीही तक्रार नाही; ठाकरे पवारांबरोबरच फडणवीस + मोदी + शाहांनाही भेटणार
- हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा म्हणणाऱ्या कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी अखेर मागितली माफी; पण…
- गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश