- ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार मात्रांचा पुरवठा.
- गडकरी यांनी ‘मायलन इंडिया’कंपनीसोबत चर्चा करून तात्काळ चार हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले असून त्यांची दुसरी खेपदेखील लवकरच प्राप्त होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यात रेमडेसिविर इंजक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असेलल्या नागपूर शहरात निर्माण झालेली रेमडीसिविर इंजेक्शनची टंचाई संपविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आणि नागपूरकरांना सन फार्मातर्फे या इंजेक्शनचे चार हजार डोजेस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.उर्वरित सहा हजार डोस लवकरच प्राप्त होणार आहेत.Crisis reliever: With the promptness of Nitin Gadkari, the problem of Nagpur’s remediation was solved
एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री ‘रेमडेसिवीर आमच्या घरी तयार होत नाही’ अशी विधाने करण्यात मग्न आहेत. त्याचवेळी राज्यातील ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या तुडवड्याचे संकट दूर करण्यासाठी भाजप तत्पर मदतीला धावून आले आहे.
‘रेमडेसिवीर’चे उत्पादन करणाऱ्या देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘मायलन/व्हिटारीस इंडीया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्यासाठी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर गडकरी यांच्या विनंतीवरून ‘मायलन इंडिया’ने राज्यासाठी तात्काळ चार हजार ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे लवकरच इंजेक्शनची दुसरी खेपदेखील पाठविण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांना देखील एक आवाहन केले आहे.
यापूर्वीदेखील गडकरी यांनी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी इंजेक्शनच्या तुडवड्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार मात्रांचा पुरवठा नागपुरात झाला असून उर्वरित मात्रादेखील लवकरच प्राप्त होणार आहेत.
Crisis reliever: With the promptness of Nitin Gadkari, the problem of Nagpur’s remediation was solved