• Download App
    काँग्रेससाठी पंजाब आड, तर छत्तीसगड विहीर; 12 आमदारांनी हायकमांडला भेटण्यासाठी दिल्ली गाठली । crisis in Chhattisgarh congress Like Punjab, 12 MLA reached Delhi to meet the HighCommand

    काँग्रेससाठी पंजाब आड, तर छत्तीसगड विहीर; 12 आमदारांनी मुख्यमंत्री बदलासाठी दिल्ली गाठली, हायकमांडला भेटणार

    crisis in Chhattisgarh congress Like Punjab : काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत, पंजाब काँग्रेसमध्ये आधीच मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे आणि त्यात आता छत्तीसगडमधील राजकीय उलथापालथीची भर पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छत्तीसगडचे 12 काँग्रेस आमदार दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांनी हायकमांडला भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. हे सर्व आमदार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. छत्तीसगडमध्येही नेतृत्वात बदलासाठी हे आमदार हायकमांडला गळ घालणार असल्याचे बोलले जात आहे. crisis in Chhattisgarh congress Like Punjab, 12 MLA reached Delhi to meet the HighCommand


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत, पंजाब काँग्रेसमध्ये आधीच मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे आणि त्यात आता छत्तीसगडमधील राजकीय उलथापालथीची भर पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छत्तीसगडचे 12 काँग्रेस आमदार दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांनी हायकमांडला भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. हे सर्व आमदार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. छत्तीसगडमध्येही नेतृत्वात बदलासाठी हे आमदार हायकमांडला गळ घालणार असल्याचे बोलले जात आहे.

    2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 15 जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत असलेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दोन प्रबळ दावेदार होते. एक भूपेश बघेल आणि दुसरे टी. एस. सिंहदेव. अधूनमधून अशी चर्चा रंगते की, त्यावेळी काँग्रेस हायकमांडने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे सूत्र ठरवले होते आणि भूपेश बघेल पहिल्या टर्मसाठी मुख्यमंत्री झाले. आता अडीच वर्षे पूर्ण झाली आणि आता टीएस सिंहदेव यांची वेळ आली आहे. पण मुद्दा इथेच अडकला आहे.

    मुख्यमंत्रिपदासाठी दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा दोघांमधील मतभेद वाढले, तेव्हा दोघांनाही दिल्लीला बोलावण्यात आले. त्यानंतर भूपेश बघेल म्हणाले होते की, राहुल गांधी यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे. पण टीएस सिंहदेव म्हणाले होते की, त्यांनी आपला मुद्दा हायकमांडला सांगितला आहे आणि आता अंतिम निर्णय त्यांच्या हातात आहे.

    मात्र, आता छत्तीसगड काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. टीएस सिंहदेव यांचा गट अडीच वर्षांचे वचन पूर्ण करण्यासाठी हायकमांडवर दबाव आणत आहे. त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तर भूपेश बघेल आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत. ऑगस्ट महिन्यातच छत्तीसगड काँग्रेसच्या 22 आमदारांनी दिल्लीत हायकमांडची भेट घेतली होती.

    या सर्व परिस्थितीमुळै काँग्रेससाठी पंजाब आड, छत्तीसगड विहीर अशीच अवस्था झाली आहे. पंजाबमध्ये कॅप्टर अमरिंदर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांनीही नवे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मंत्रिमंडळात स्वत:च्या ऐकण्यातली माणसे नाहीत म्हणून पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधला जी-23 गट पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यांनी पक्षाध्यक्षाची नियुक्ती नसल्याच्या मुद्द्यावरून गांधी कुटुंबाला घेरले आहे. सर्व बाजूंनी काँग्रेसमध्ये उलथापालथ सुरू असल्याचे हे चित्र आहे.

    crisis in Chhattisgarh congress Like Punjab, 12 MLA reached Delhi to meet the HighCommand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!