वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा जवळपास 900 पुरुष आणि महिला क्रिकेटपटू तसेच सामना अधिकाऱ्यांना होणार आहे.Cricketers Pension BCCI hikes ex-cricketers’ pensions, gives direct benefits to 900 players and officials
बीसीसीआय सचिव म्हणाले की, लवकरच लोकांना त्याचा लाभ मिळू लागेल. त्यांनी ट्विट केले की, माजी क्रिकेटपटू आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. सुमारे 900 लोकांना याचा लाभ होणार आहे. ज्यांना पेन्शन मिळत आहे, त्यापैकी सुमारे 75 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के पेन्शन वाढीचा लाभ घेता येणार आहे.
ज्या खेळाडूंना निवृत्तिवेतन म्हणून 15 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 30 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 22 हजार 500 रुपये पेन्शन मिळालेल्या माजी क्रिकेटपटूंना मासिक 45 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
ज्यांना आतापर्यंत 30,000 रुपये मिळत होते, त्यांना आता 52,500 रुपये मिळतील. त्याचबरोबर 37,500 रुपये मिळालेल्या माजी खेळाडूंना आता 60,000 रुपये मिळणार आहेत. 50,000 रुपये पेन्शन असलेल्यांना 70,000 रुपये मिळतील.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले- आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर त्यांची काळजी घेणे ही बोर्ड म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याच वेळी, पंच हे अनसंग हिरोसारखे असतात आणि बीसीसीआयला त्यांच्या योगदानाची जाणीव आहे.
Cricketers Pension BCCI hikes ex-cricketers’ pensions, gives direct benefits to 900 players and officials
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात एकटे पडले काँग्रेसचे युवराज, राहुल गांधींना विरोधकांची मिळाली नाही साथ
- राजभवनातील भुयार क्रांतिकारक गॅलरीतून सावरकरांसह असंख्य क्रांतिकारकांना वंदन; उद्या मोदींच्या हस्ते उद्घाटन
- नॅशनल हेराल्ड केस : “झुकेगा नही” म्हणणारा काँग्रेसचा “पुष्पा” पोलिसांना घाबरून पळाला!!
- ओबीसी एम्पिरिकल डाटा : फडणवीसांच्या शंकेला भुजबळ, वडेट्टीवार यांचा दुजोरा!!; प्रकरणाचे नेमके गंभीर्य काय??