• Download App
    Cricketer Rinku Singh क्रिकेटपटू रिंकू सिंग अन् खासदार प्रिया

    Cricketer Rinku Singh : क्रिकेटपटू रिंकू सिंग अन् खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा

    Cricketer Rinku Singh

    अखिलेश-डिंपलसह ३०० व्हीआयपी पाहुणे; जाणून घ्या सविस्तर माहिती


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : Cricketer Rinku Singh भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा आहे. राजकारण आणि क्रिकेटच्या या हायप्रोफाइल कॉकटेलवर रविवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पहिला अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.Cricketer Rinku Singh

    रिंकू सिंग आणि प्रिया सरोज लखनऊमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांना अंगठ्या घालणार आहेत. या खास कार्यक्रमाला राजकारणासह क्रिकेट जगतातील अनेक मोठी मंडळी उपस्थित राहण्याची चर्चा आहे.



    आयपीएल संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवचाही साखरपुडा देखील त्याच हॉटेमध्ये झाला आहे. आता रिंकू आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा होणार आहे. सर्वेश गोयल म्हणाले की, राजकारण आणि क्रिकेटशी जोडलेल्या कुटुंबाच्या साखरपुड्याला अनेक क्रिकेटपटू आणि राजकारणी येणार असल्याची चर्चा आहे.

    कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईक अंगठी समारंभाला उपस्थित राहतील. यावर्षी १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील हॉटेल ताज येथे पारंपारिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडेल. या विवाह सोहळ्याला क्रिकेट स्टार, बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि प्रमुख राजकारण्यांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट एका कॉमन मैत्रिणीच्या माध्यमातून झाली. हळूहळू दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाली आणि नंतर हे नाते प्रेमात रूपांतरित झाले. प्राप्त माहितीनुसार, लग्न पारंपारिक विधींनुसार होईल. दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला आणि आता ते एका नवीन सुरुवातीसाठी तयार आहेत.

    Cricketer Rinku Singh and MP Priya Saroj get engaged today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    S Jaishankar : SCO बैठक, जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये पुतीन यांची घेतली भेट, परराष्ट्र मंत्री म्हणाले- आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक पाऊल उचलू

    Dr. Umar Suicide : दहशतवादी डॉ. उमर आत्मघाती बॉम्बर तयार करत होता; 11 तरुणांच्या ब्रेनवॉशसाठी 70 व्हिडिओ पाठवले

    2026 पर्यंत बद्रीनाथ स्मार्ट आध्यात्मिक शहर बनणार; ₹481 कोटी खर्च, PMO करत आहे मॉनिटरिंग