वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेट खेळले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. म्हणजेच 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट परतणार आहे.Cricket included in Olympics after 128 years; 5 new sports approved for 2028 Los Angeles Olympics
क्रिकेटसह 5 खेळांचा समावेश करण्याच्या निर्णयाला आयओसी कार्यकारी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रिकेट व्यतिरिक्त, यामध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोस यांचा समावेश आहे.
या महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव स्वीकारला.
1900 च्या ऑलिम्पिकमध्ये होते क्रिकेट
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पॅरिस ऑलिम्पिक (वर्ष 1900) मध्येही क्रिकेट खेळले गेले होते. तेव्हा ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सने सुवर्णपदकासाठी फक्त एक कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये ग्रेट ब्रिटन संघाने 158 धावांनी विजय मिळवला होता.
1998 आणि 2022 मध्ये दोनदा कॉमनवेल्थ गेम्समध्येही क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2010, 2014 आणि 2023 मध्ये तीनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटला स्थान मिळाले.
फ्लॅग फुटबॉललाही एंट्री
जगाला फुटबॉलची माहिती आहे. आता लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 साठी फ्लॅग फुटबॉललाही प्रवेश देण्यात आला आहे. अहवालानुसार, फ्लॅग फुटबॉलमध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी पाच खेळाडू असतात. याला फुटबॉलचा अमेरिकन प्रकार म्हटले जाते.
Cricket included in Olympics after 128 years; 5 new sports approved for 2028 Los Angeles Olympics
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी; दुसरीकडे मणिशंकर अय्यरसह काँग्रेसी – डावे – समाजवादी खासदार पॅलेस्टिनी दूतावासात!!
- पुण्यातील नवले पुलावर कंटेनरला धडकल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू
- Income Tax Raid : चार दिवसांत १ अब्ज रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त, ९४ कोटी रुपयांची रोकड जप्त
- Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, ‘या’ सात खासदारांना मिळाले तिकीट!